Shah Rukh Khan Jawan Entry in Oscar : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 'जवान' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा, अशी चाहते मागणी करत आहेत.
'जवान' या सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) याने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ऑस्करबद्दल भाष्य केलं आहे. अॅटली म्हणाला,"ऑस्कर हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा अशी मागणी चाहते करत आहेत. चांगल्या कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकाची सिनेमाचा जागतिक पातळीवर गौरव व्हावा, अशी इच्छा असते. 'जवान' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा अशी माझीदेखील इच्छा आहे. किंग खान यांच्याकडे मी माझी इच्छा व्यक्त करणार आहे. त्यांनी होकार दिला तर लगेचच मी एन्ट्री पाठवणार आहे.
'जवान' या सिनेमाबद्दल बोलताना अॅटली कुमार म्हणाला,"जवान' या सिनेमाचं कथानक 2020 मध्ये शाहरुख खान यांना ऐकवलं होतं. पण आमची पहिली भेट 2019 मध्ये झाली होती. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मी त्यांना या सिनेमाची कथा ऐकवली होती. शाहरुख खान माझ्या सिनेमाचा भाग असावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे कोरोनाकाळातच मी त्यांना सिनेमाबद्दल सांगितलं".
अॅटली कुमार पुढे म्हणाला,"शाहरुख खानला कथा ऐकवल्यानंतर लगेचच त्यांनी होकार दिला आणि वेळ असेल तेव्हा भेटू असे सांगितले. साडे तीन तास मी त्यांना कथा ऐकवली. गौरी खान यांनादेखील 'जवान' या सिनेमाचं कथानक आवडलं. त्यानंतर लगेचच आम्ही या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. त्यामुळे 2019 हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. 'जवान' या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मी शाहरुख खानसोबत काम केलं आहे".
शाहरुखच्या 'जवान'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Shah Rukh Khan Jawan Box Office Collection)
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जवान' या सिनेमाने रिलीजच्या 12 दिवसांत 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर भारतात या सिनेमाने 493.63 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'जवान' हा शाहरुख खानचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1055 कोटींची कमाई केली.
संबंधित बातम्या