Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम बंद का केला? असा प्रश्न नुकताच एका नेटकऱ्यानं अवधूत गुप्तेला (Avadhoot Gupte)  विचारला. अवधूत गुप्तेनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


ट्विटरवर अवधूत गुप्तेला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, 'खुप छान शो….आम्ही नेदरलँडमध्ये हा शो पाहतो आणि हा शो आम्हाला आवडतोही….का बंद करतोय? लई भारी वाटतंय अवधुतदा'  नेटकऱ्याच्या या ट्वीटला अवधूतनं रिप्लाय दिला, 'पुढचा सीझन लवकरच करनार की वो दादा!!' आता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या पुढच्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 





सुप्रिया सुळे यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या शेवटच्या एपिसोडमध्ये हजेरी  लावली होती. या कार्यक्रमाचा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सुप्रिया सुळे या भावूक झालेल्या दिसल्या. तसेच अवधूत गुप्तेनं  खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये  सुप्रिया सुळे यांना विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न देखील विचारले.  अवधूत गुप्ते  हा खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारतो, "कोण प्रभावी उपमुख्यमंत्री आहेत? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?"  या प्रश्नाचं सुप्रिया सुळे या "अजित पवार" असं उत्तर देतात. 


राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमात अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. आता खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं हे नवं पर्व 10 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता या कार्यक्रमाचे पुढील पर्व कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Khupte Tithe Gupte: अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोण प्रभावी उपमुख्यमंत्री? गुप्तेंचा प्रश्न, ताईंचं उत्तर कुणाला खुपणार?