Telly Masala : रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी ते बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Riteish Deshmukh Genelia Dsouza : रितेश देशमुख-जिनिलियाची 'वेड' लावणारी लव्हस्टोरी! अभिनेत्याने आजही जपून ठेवलंय पहिलं गुलाब अन् प्रेमपत्र
Riteish Deshmukh Genelia Dsouza Love Story : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुझा (Genelia Dsouza) हे बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल आहे. दोघे इंडस्ट्रीतील आयडल कपल म्हणून ओळखले जातात. गेल्या 20 वर्षांपासून ते एकमेकांसोबत आहेत. 9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. 'कपिल शर्मा शो'मध्ये दोघांनी आपल्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tujhi Majhi Jamli Jodi : 'तुझी माझी जमली जोडी' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' दिवशी होणार सुरु
Tujhi Majhi Jamli Jodi : 'तुझी माझी जमली जोडी' (Tujhi Majhi Jamli Jodi) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. मैत्री असावी तर अस्मिता देशमुख आणि संचित चौधरी यांच्यासारखीच हे दाखवणारी ही मालिका असेल. 11 डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Year Ender 2023 : बॉक्स ऑफिसवर सिनेमांची मांदीयाळी! 2023 मध्ये रिलीज झालेल्या A टू Z मराठी चित्रपटांबद्दल जाणून घ्या
Marathi Movies Release on 2023 : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास होतं. जानेवारी ते डिसेंबर 2023 दरम्यान अनेक बिग बजेट, विविध धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) रिलीज झाले. या सिनेमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. आता वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असून या वर्षात प्रदर्शित झालेले सिनेमे पाहायचे तुमचे राहिले असतील तर नक्की पाहा.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jhimma 2 : 'झिम्मा 2'ची टूर सुसाट सुटली; बॉलिवूडपटांना टक्कर देणारा मराठी चित्रपट
Jhimma 2 Box Office Collection : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा मराठी सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या मराठी सिनेमाने अनेक बॉलिवूडपटांना टक्कर दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serials : 'या' आठवड्याच्या 'TOP 10' मालिकांबद्दल जाणून घ्या...
Marathi Serials TRP Report : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Paulanni) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.