Telly Masala : किरण माने तृतीयपंथीयांच्या भेटीला ते दिग्पाल लांजेकरांनी केली 'मुक्ताई'ची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Kiran Mane : किरण मानेंनी दसऱ्याच्या मुहुर्तावर घेतली तृतीयपंथीयांची भेट; म्हणाले,"माझा दिवस सोन्याचा केला"
Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मनोरंजनसृष्टीसह राजकीय विषयावर त्यांची मतं मांडत असतात. आता दसऱ्याच्या मुहुर्तावर त्यांनी तृतीयपंथीयांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bharat Jadhav : भरत जाधवचं नवं नाटक; अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे 'अस्तित्व'
Bharat Jadhav On Astitva Drama : नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' (Astitva) हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rupali Bhosle : "आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे फोटो..."; आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेनं सांगितला विमान प्रवासादरम्यान आलेला अनुभव
Rupali Bhosle: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. या मालिकेत संजना ही भूमिका रूपाली साकारते. रुपाली ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. नुकतीच रुपालीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रुपालीनं विमान प्रवासादरम्यान तिला आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Digpal Lanjekar : "नवे क्षितीज … नवे सीमोल्लंघन"; दिग्पाल लांजेकरांनी केली 'मुक्ताई' चित्रपटाची घोषणा
Digpal Lanjekar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सुभेदार चित्रपटानंतर दिग्पाल यांचा ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता दिग्पाल यांनी नुकतीच त्यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'मुक्ताई' असं आहे. एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन दिग्पाल यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kalam 367 : ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला; 'कलम 367'चं पोस्टर आऊट
Kalam 367 : हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या 'कलम 367' (Kalam 367) या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे (Sachin Dhotre) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.