एक्स्प्लोर

Kalam 367 : ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला; 'कलम 367'चं पोस्टर आऊट

Kalam 367 : 'कलम 367' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kalam 367 : हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या 'कलम 367' (Kalam 367) या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे (Sachin Dhotre) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम 367 या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसते. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.  चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणारा 'कलम 367'

आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्डहिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं मराठीत अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे "कलम 367" हा चित्रपट कथानक कशा पद्धतीनं मांडणार याकडे लक्ष लागले आहे. 

'कलम 367'मध्ये काय पाहायला मिळणार?

'कलम 367' सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संतोष धोत्रे म्हणाले,"लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. गेल्या चार दशकांत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. दोन वर्षांच्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत बलात्काराच्या बळी ठरत आहेत. अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवनवीन सबबी शोधत असतात. 

सचिन धोत्रे पुढे म्हणाले,"वृत्तमाध्यमांतून महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या बातम्या रोज दाखवल्या जातात, पण ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची कुठेही चर्चा होत नाही. असे अत्याचार कधी थांबणार? आपण फक्त मूक प्रेक्षक बनून आपली पाळी येण्याची वाट पाहणार आहोत का? मुलींवर अत्याचार पूर्वीही होत होते आणि आजही होत आहेत. ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर...? आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट आणि अपमानास्पद नजरेने पाहिले जाते. समाज किंवा सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे".

संंबंधित बातम्या

Deva Release Date: डोळ्यावर गॉगल अन् हातात बंदुक; ‘देवा’ चित्रपटामधील शाहिदचा फर्स्ट लूक आऊट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget