Kshitee Jog : रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग
Kshitee Jog : 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमात क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
![Kshitee Jog : रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग Marathi Actress Kshitee Jog will appear in Ranveer Singh Rocky Aur Rani Ki Prem Kahani Kshitee Jog : रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/e4591fb7f43a9858b9ec380079d19e0b1659980873531254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kshitee Jog : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहचा (Ranveer Singh) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
क्षिती जोग मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेमांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आलिया-रणवीरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात मराठमोळी क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
धर्मा प्रॉडक्शनच्या 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमात क्षिती जोग दिसणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. या सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर एक खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचा एक व्हिडिओ रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर क्षितीला मिठी मारताना दिसत आहे. क्षितीनेदेखील शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.
आलिया आणि रणवीरशिवाय 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील दिसणार आहेत. सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया भट्ट नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लवकरच तिचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर
Arjun Bijlani : करण जोहरच्या बहुचर्चित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार अर्जुन बिजलानी; खास पोस्ट केली शेअर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)