Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी मुंबईतील आलिशान घराची केली विक्री, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार; घराची किंमत किती?
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या मुंबईतल्या आलिशान घराची विक्री केली आहे. कोट्यवधी रुपयांना त्यांनी त्यांच्या या घराचा व्यवहार केला आहे.
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांना नुकताच 'गुलमोहर' (Gulmohar) या सिनेमासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. नुकताच त्यांचा 'भैय्या जी' हा 100 सिनेमा देखील प्रदर्शित झाला होते. त्याची निर्मिती देखील मनोज वाजपेयी यांनी केली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र चांगली कामगिरी करु शकला नाही. अनेक वर्ष इंडस्ट्री काम करणाऱ्या या अभिनेत्याच्या मुंबईत अनेक मालमत्ता देखील आहेत.
दरम्यान त्यांनी नुकतच मुंबईतील त्यांचं एक आलिशान घर विकलं असल्याची बातमी समोर आली आहे. मनोज वाजपेयी यांनी त्यांची पत्नी शबाना वाजपेयीसोबत या घराची खरेदी केली होती. पण आता त्यांनी या घराची विक्री केली असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येत असल्याचं म्हटलं जातंय.
अकरा वर्षांनी विकलं मुंबईतलं घर
रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जात आहे की 2013 मध्ये या घराची किंमत 6.4 कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर आता 11 वर्षांनी अभिनेत्याने या घराची विक्री केली असून 9 कोटी रुपयांना हे घर विकलं आहे. या व्यवहारामुळे मनोज वाजपेयी यांनी जवळपास 2.6 कोटी रुपयांचा नफा झाला असल्याचीही माहिती समोर आली आहे. बॉलीवूड हंगमाच्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने 54 लाख रुपये स्टँप ड्युटी देऊन या घराची खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील घराची केली विक्री
मुंबईतील लोअर परळ येथील मिनर्वा येथे मनोज वाजपेयी यांचं हे घर आहे. येथील महालक्ष्मी टॉवरमधील त्यांचं घर हे 1247 स्क्वेअर फुट इतकं आहे. सध्या मनोज वाजपेयी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह अंधेरीमधील लोखंडवाला भागात राहतात.
मनोज वाजपेयींनी घर का विकलं?
मनोज वाजपेयींनी हे घर त्यांनी गुंतवणूक करण्यासाठी घेतलं असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्यांनी आता या घराची विक्री का केली याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान या घराचं रजिस्ट्रेशन पण याच ऑगस्ट महिन्यात झालं असल्याचीही माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram