Shah Rukh Khan: मन्नतच्या बाहेर तासंतास उभा राहिला, किंग खानच्या मागे फिरला, अखेर इच्छा पूर्ण झाली; एक महिन्याच्या स्ट्रगलनंतर शाहरुखला भेटला चाहता
Shah Rukh Khan: आकाश पिल्ले नावाच्या तरुणाची शाहरुख खानला भेटण्याची इच्छा होती. आकाश त्यासाठी एक महिना प्रयत्न देखील करत होता. आता आकाशची इच्छा पूर्ण झाली आहे.
![Shah Rukh Khan: मन्नतच्या बाहेर तासंतास उभा राहिला, किंग खानच्या मागे फिरला, अखेर इच्छा पूर्ण झाली; एक महिन्याच्या स्ट्रगलनंतर शाहरुखला भेटला चाहता Man completed his dream of meeting Shah Rukh Khan after month long struggle Shah Rukh Khan: मन्नतच्या बाहेर तासंतास उभा राहिला, किंग खानच्या मागे फिरला, अखेर इच्छा पूर्ण झाली; एक महिन्याच्या स्ट्रगलनंतर शाहरुखला भेटला चाहता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/dc9ec8cb96dbcb7c087f1a8a0e8db0e81696154786599259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. फक्त देशातच नाही तर परदेशात देखील शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखला बघण्याची, तसेच त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा अनेकांची असते. अशीच इच्छा आकाश पिल्ले नावाच्या तरुणाची होती. शाहरुखला भेटण्याची आकाश पिल्लेची इच्छा होती. आकाश त्यासाठी एक महिना स्ट्रगल देखील करत होता. आता आकाशची इच्छा पूर्ण झाली आहे.
आकाश पिल्ले नावाच्या तरुणानं 25 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आकाशनं त्यानंतर शाहरुखला भेटण्यासाठी बरेच प्रयत्न देखील केले. आकाश त्याच्या प्रत्येक दिवसाची अपडेट चाहत्यांना देत होता.
आकाश हा "Waiting For SRK" नावाचा बोर्ड घेऊन शाहरुखच्या मन्नत बंगल्या बाहेर तासंतास उभा राहात होता. तसेच तो शाहरुखच्या इव्हेंट्सची माहिती मिळवून त्या इव्हेंटला जात होता. हे सर्व करुन देखील आकाश शाहरुखला भेटू शकला नाही. पण जवळपास एक महिन्यांच्या प्रयत्नानंतर शाहरुखची मॅनेजर पूजासोबत आकाशचं बोलणं झालं. त्यानंतर आकाशला शाहरुखला भेटण्याची संधी मिळाली.
View this post on Instagram
आकाशनं शाहरुखसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है.." आकाशनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी आकाशचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट रिलीज झाला होता. आकाश हा त्याच्या फॉलोवर्ससोबत जवान हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. आकाशनं थिएटरमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
जवान या चित्रपटानंतर शाहरुखच्या डंकी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. डंकी या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)