Maleesa Mooney Passes Away : 'या' मॉडेलचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह; गरोदर असल्याची माहिती समोर
Maleesa Mooney : लोकप्रिय मॉडेल मलीसा मूनीचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
Maleesa Mooney Passes Away : लोकप्रिय मॉडेल मलीसा मूनीचे (Maleesa Mooney) निधन झाले आहे. मलीसाचा मृतदेह फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला आहे. अभिनेत्री गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. मलीसासोबत घडलेला धक्कादायक प्रकार पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मलीसा मूनी लॉस एंडेलिसमध्ये राहत होती. मलीसाचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत मृतदेह आढळला तेव्हा तिचे हात-पाय घट्ट बांधून ठेवलेले होते. तसेच मृत्यूपर्वी मलीसाची मारहाण करण्यात आली असल्याचंही स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी आता सर्वत्र खळबळ माजली आहे.
मृत्यूआधी मलीसासोबत हिंसा झाल्याचं समोर
मीडिया रिपोर्टनुसार, मलीसा मूनीच्या मृतदेहाचे लॉस एंजेलिस येथील काउंटीच्या वैद्यकीय परीक्षक विभागाकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूआधी मलीसासोबत हिंसा झाल्याचं समोर आलं आहे. मॉडेलच्या शरीरावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला होता. तिच्या शरीरात अल्कोहोल आणि कोकेनचे अंशही सापडले आहेत.
मलीसा मूनीचा मृतदेह लॉस एंजेलिस अपार्टमेंटमधील फ्रिजमध्ये सापडला होता. या अपार्टमेंटमध्ये ती 6 सप्टेंबरला शेवटची दिसली होती. 6 सप्टेंबरनंतर ती दिसली नसल्याने मॉडेलच्या आईने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. तिच्या आईच्या विनंतीवरुन पोलिसांनी मॉडेलच्या अपार्टमेंटची तपासनी केली. त्यावेळी त्यांना फ्रिजमध्ये तिचा मृतदेह सापडला.
View this post on Instagram
मलीसाच्या आयक्लाऊडवर एक अलर्ट मेसेज आला होता. त्यामुळे तिला मोबाईल आणखी कोणी व्यक्ती वापरत असल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. आता याप्रकरणी पुढे काय उघड होणार हे जाणून घेण्याची मलीसाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. मलीसाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मलीसाच्या बहिणीने समाचार चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,"माझी बहीण कोणत्या परिस्थितीतून जात होती याचा मी विचारही करू शकत नाही". मलीसाच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. मलीसा ही लोकप्रिय मॉडेल होती. आता वयाच्या 31 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या