Chaiyya Chaiyya Song: मलायका नव्हती 'छैय्या छैय्या' साठीची पहिली पसंती, 'या' अभिनेत्रीला देण्यात आली होती ऑफर पण....
छैय्या छैय्या (Chaiyya Chaiyya) गाण्यासाठी मलायका (Malaika Arora) ही पहिली पसंती नव्हती, हे अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात या गाण्याच्या कास्टिंगबाबत...
Chaiyya Chaiyya Song: बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मलायकाला छैय्या छैय्या (Chaiyya Chaiyya) गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या गाण्यात धावत्या रेल्वेवर मलायका आणि शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) केलेल्या डान्सनं अनेकांची मनं जिंकली. हे गाणं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल से या चित्रपटातील आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 24 वर्ष झाली आहेत, तरी देखील या चित्रपटातील छैय्या छैय्या हे गाणं अनेक लोक आजही आवडीनं ऐकतात. पण छैय्या छैय्या गाण्यासाठी मलायका ही पहिली पसंती नव्हती, हे अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात या गाण्याच्या कास्टिंगबाबत...
शिल्पा शिरोडकरला देण्याच आली होती ऑफर
मलायकाच्या आधी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला छैय्या छैय्या या गाण्याची ऑफर देण्यात आली होती. पण शिल्पाचं वजन जास्त असल्यानं नंतर शिल्पाला रिजेक्ट करण्यात आलं. ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पानं सांगितलं की, 'छैय्या छैय्यासाठी माझा विचार केला गेला. पण त्यांना वाटले की मी खूप जाड आहे म्हणून त्यांनी मलाइकाला ऑफर दिली.' शाहरुखसोबत डान्स करण्याची संधी हुकल्यामुळे ती नाराज झाली होती, असंही शिल्पानं सांगितलं.
फराह खाननं सांगितला किस्सा
उटी आणि कुन्नूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर चालत्या ट्रेनमध्ये ‘छैय्या छैय्या’ शूट करण्यात आले. या गाण्याची कोरिओग्राफी ही फराह खाननं केली आहे. काही दिवसांपूर्वी फराह खाननं मुव्हिंग विथ मलायका या शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये फराहनं मलायकाला छैय्या छैय्या या गाण्याबाबत सांगितलं.
फराहनं सांगितलं की, 'तू छैय्या छैय्या गर्ल आहेस. पण तुझ्या आधी पाच अभिनेत्रींनी ट्रेनमध्ये चढण्यास नकार दिला होता. आम्ही या गाण्यासाठी शिल्पा शेट्टी कुंद्रा, शिल्पा शिरोडकर आणि इतर 2-3 लोकांशी संपर्क साधला होता.' सुखविंदर सिंह आणि सपना अवस्थी यांनी हे गाणं गायलं असून या गाण्याचं संगीत दिग्दर्शन ए.आर.रहमान यांनी केले आहे.
मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Malaika Arora: 'अपघातानंतर डोळे उघडताच...'; मलायकानं सांगितला थरारक अनुभव