(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malaika Arora : संस्कार नाहीत का? मुलाला वर्जिनिटीवर विचारलेल्या प्रश्नावर मलायकावर नेटकरी संतापले
Malaika Arora : मलायकाने आपला 21 वर्षीय मुलगा अरहानला त्याच्या सेक्स लाईफबद्दलही प्रश्न विचारला. त्यावरून तिच्यावर टीका करण्यात येत आहे.
Malaika Arora : आपल्या फिटनेस, सौंदर्याने आणि नृत्य कौशल्याने छाप सोडणारी मलायका अरोरा (Malaika Arora) आता पुन्हा चर्चेत आली आहे. मलायकाने मुलगा अरहानला विचारलेल्या प्रश्नावरून मलायकावर नेटकऱ्यांची टीकेची झोड उठवली आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच चर्चेत आला आहे. अरहान खानने आपल्या मित्रांसोबत एक चॅट शो 'डंब बिर्याणी' हा शो सुरू केला आहे. यामध्ये खान कुटुंबासह बॉलिवूडमधील इतर मंडळीदेखील हजेरी लावत आहेत. या चॅट शोमध्ये अनेक गमतीशीर गौप्यस्फोट होत आहेत. अरबाज आणि सोहेल खान यांनी याआधीच अरहानच्या शोमध्ये हजेरी लावली. यामध्ये त्यांनी लग्न, घटस्फोट, नातेसंबंधावर भाष्य केले.
मलायका ट्रोल का होतेय?
आता मलायका अरोरादेखील या शोमध्ये हजेरी लावणार आहे. मलायकाच्या एपिसोडचा टीझर आऊट झाला आहे. सध्या हा टीझर इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. शोमध्ये मलायका आणि अरहान यांनी एक गेम खेळला. यात त्यांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले.
View this post on Instagram
मलायकाने आपला 21 वर्षीय मुलगा अरहानला त्याच्या सेक्स लाईफबद्दलही प्रश्न विचारला. मलायकाने त्याला तू तुझी वर्जिनिटी कधी गमावली असे थेट विचारले. चक्क आईनेच असा प्रश्न केल्याने अरहानला आश्चर्याचा धक्का बसला. त्यावर मलायकाने मला प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर दे असे म्हटले. तर, अरहानने देखील तू लग्न कधी करणार आहेस, असा प्रश्न केला आहे.
View this post on Instagram
युजर्स संतापले...
अरहान सोबत मलायकाचे असलेले स्ट्राँग बाँड तिच्या चाहत्यांना आवडले. काहींनी तर हा एपिसोड लवकर रिलीज करण्याची मागणी केली.
काही युजर्सने मात्र मलायकावर थेट टीकेची झोड उठवली आहे. आपल्या तरुण मुलाच्या सेक्स लाईफवर असा प्रश्न विचारणे चुकीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तर, एका युजरने बॉलिवूडने किती खालची पातळी गाठली आहे. मॉडर्न होण्याच्या नादात आई-मुलाच्या नात्याची मर्यादा विसरता कामा नये असे त्याने म्हटले. एका युजरने हे सगळं लज्जास्पद असल्याचे म्हटले.
हे सेलिब्रिटी तर भारतीय संस्कृती उद्धवस्त करत असल्याचे म्हटले. एका युजरने तर हे कसले संस्कार आहेत असे विचारले.