(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malaika Arora Father death : 'काही दिवसांपूर्वी...' मलायका अरोराच्या वडिलांविषयी शेजाऱ्यांचा मोठा खुलासा
Malaika Arora Father death : मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
Malaika Arora Father Demise: मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांचे 11 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यांनी घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. अनिल यांच्यावर आज कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. हे. त्याने सांगितले की, अनिलमध्ये काही दिवसांपूर्वी ऊर्जा कमी होती.
दरम्यान आता अनिल अरोरा यांच्या शेजाऱ्यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे. एका शेजाऱ्याने फिल्मीबीटशी बोलताना म्हटलं की, मलायकाचे अनिल अरोरासोबत खूप चांगले संबंध होते. ते अनेकदा एकत्र पार्टीही करायचे. मलायका अरोराचा मुलगा अरहानही इथे बराच काळ राहिला होता. अनिल अरोरा हे सहाव्या मजल्यावर राहत होते. त्यांच्या घटस्फोटानंतरही, त्याचे जॉयसशी चांगले संबंध होते.
'अनिल नेहमी आनंदी आणि...'
याच शेजाऱ्यांनी पुढे म्हटलं की, 'काही दिवसांपूर्वी आमच्या शेजारच्या घरात लिकेजचा प्रोब्लेम झाला होता. त्यावेळी अनिल हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आले होते. अनिल ही फार आनंदी व्यक्ती होती. पण काही दिवसांपासून तो फार थकल्यासारखा वाटत होता.
प्रकृतीबाबत शेजाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नाही
मलायका अरोराच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल बोलताना तिच्या शेजाऱ्याने सांगितले की, ती यावर भाष्य करू शकत नाही. अनिलला काही आजार आहे की नाही किंवा तो कोणत्या मानसिक समस्येशी झुंजत आहे, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
मलायकाच्या वडिलांचा मृत्यू कशामुळे झाला?
अनिल मेहता यांनी कथितपणे वांद्रे येथील आयेशा मनोर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीमधून उडी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी (11 सप्टेंबर रोजी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अनिल मेहता यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले. या पोस्टमार्टेममध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल मेहता यांनी इमारतीच्या बाल्कनीतून थेट उडी मारल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले. त्याशिवाय, त्यांच्या शरीरावर एकहून अधिक जखमा झाल्याचे आढळले आहे.