एक्स्प्लोर

Malaika Arora Father Death : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना झाला होता आई-वडिलांचा घटस्फोट

Malaika Arora Father Anil Arora Death : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. मुंबईतील वांद्रे येथील इमारतीवरून त्यांनी उडी मारुन आयुष्य संपवले.

Malaika Arora Father Anil Arora Death :  बॉलिवूडमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली. अभिनेत्री मलायका अरोराचे (Malaika Arora) वडील अनिल अरोरा (Anil Arora) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील वांद्रे येथील इमारतीवरून त्यांनी उडी मारुन आयुष्य संपवले. त्यांनी एवढं मोठं पाऊल का उचललं याचा तपास सुरू आहे. मलायकाचे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते. त्यांनी मल्याळी ख्रिश्चन जॉयस पॉलीकार्प यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. या दाम्पत्याला मलायका आणि अमृता ही दोन मुले आहेत. मलायका 11 वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. 

आज सकाळी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9  वाजण्याच्या सुमारास मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांनी राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच मलायकाचा पूर्व-पती अरबाज खान हा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. या घटनेच्या वेळी मलायका पुण्यात होती. अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर रोजीच मलायका आणि अमृता यांनी आपल्या आई-वडिलांची भेट घेतली होती आणि आज दुसऱ्याच दिवशी ही धक्कादायक घटना घडली. 

मर्चंट नेव्हीत होते अनिल अरोरा...

मलायका अरोराची आई जॉयस पॉलीकॉर्प या मल्याळी ख्रिश्चन आहेत. तर, वडील अनिल अरोरा हे हिंदू पंजाबी होते. त्यांनी मर्चंट नेव्हीत काम केले. 

मलायकाच्या पालकांचा घटस्फोट...

मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे आई-वडील वेगळे झाले तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. 'माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. मागे वळून पाहताना, मला ते गोंधळात टाकणारे आढळले, परंतु कठीण प्रसंग देखील तुम्हाला महत्त्वाचे धडे शिकवतात, असे मलायकाने या मुलाखतीत म्हटले. 

आई-वडिलांच्या घटस्फोटाने मिळाला धडा...

मलायकाने असेही सांगितले होते की, तिच्या पालकांच्या विभक्त होण्याने तिला तिच्या आईला एका नवीन आणि अनोख्या दृष्टीकोनातून पाहता आले. दररोज सकाळी उठणे आणि पूर्णपणे स्वतंत्र होण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे महत्त्व शिकले असल्याचे तिने सांगितले. मी अजूनही पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि माझ्या स्वातंत्र्याची कदर करते आणि माझ्या स्वतःच्या अटींवर आयुष्य जगते, असेही तिने सांगितले. 

मलायकाचा झाला आहे घटस्फोट, अमृताला दोन मुले

मलायकाने अरबाज खान सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.  अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर मलायका ही सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा आहेत. तर, अनिल अरोरा-जॉयस यांची दुसरी कन्या अभिनेत्री अमृता अरोराने शकील लडकसोबत 2009 मध्ये विवाहबद्ध झाली. या दोघांना दोन मुले आहेत. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Visarjan Vadapav : गणेश विसर्जन मिरवणुकीत 5 लाख वडापावचं होणार वाटप ABP MAJHAABP Majha Headlines : 06 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Tambdi Jogeshwari Ganpati : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जनPraniti Shinde on Ganpati Visarjan : सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदेंनी केले बाप्पाचे विसर्जन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
बाप्पाचा पा घेऊन चिमुकल्यांनी दिला निरोप; कुटुंबीयही झाले भावूक, पाहा Photos
Embed widget