एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तीन वर्षांपूर्वी मी मुलीला जन्म दिला, पण अजून लग्न केलं नाही : माही गिल
याबाबत आधी मला कोणीच काही विचारलं नव्हतं. त्यामुळे मला मुलगी असल्याचं कोणालाच सांगितलं नाही, असं सांगत अभिनेत्री माही गिल हिने आपल्याला तीन वर्षांची मुलगी असल्याचं जाहीर केलं
मुंबई : माझी मुलगी तीन वर्षांची आहे, मात्र माझं लग्न झालेलं नाही, अशी वाच्यता बॉलिवूड अभिनेत्री माही गिल हिने केली आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मी विवाहबंधनात अडकेन, असं माहीने स्पष्ट केलं. कोणी विचारलं नव्हतं, त्यामुळे मी मुलीविषयी सांगितलं नाही. ही गोष्ट लपवण्याचा प्रश्नच नव्हता, अशी पुस्तीही माहीने जोडली.
तिग्मांशू धुलिया यांचा 'साहेब, बिवी और गँगस्टर' आणि अनुराग कश्यप यांच्या 'देव डी' चित्रपटातील भूमिकांमुळे माही लोकप्रिय झाली.
तीन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात माहीने मुलीला जन्म दिला होता. 'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत माहीने आपण 'सिंगल मदर' असल्याचं जाहीर केलं.
'तुम्ही मला विचारलंच आहे, म्हणून सांगते की मी अविवाहित असून एका मुलीची आई आहे. याबाबत आधी मला कोणीच काही विचारलं नव्हतं. त्यामुळे मला मुलगी असल्याचं कोणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट लपवण्याचा प्रश्नच कुठे येतो? असा प्रश्नही माहीने विचारला.
'माझ्या मुलीचं नाव वेरोनिका आहे. माझी मावशी तिची काळजी घेते. आम्ही मुंबईत एकत्र राहतो' असं तिने सांगितलं.
'मी लग्न करण्याची काय गरज आहे? अविवाहित राहूनही एखादी व्यक्ती आनंदात जगू शकते. लग्नाशिवायही एखाद्याचं कुटुंब आणि मुलं असू शकतात. लग्न ही निश्चितच सुंदर गोष्ट आहे. परंतु लग्न करणं हा वैयक्तिक निर्णय आहे' असं माही म्हणाली.
'प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्यावर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी आणि स्वातंत्र्य देणारी व्यक्ती मला हवी आहे. माझा बॉयफ्रेण्ड गोव्यात राहतो. म्हणून मी वारंवार तिथे जात असते. आम्ही सध्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहोत. आम्ही कदाचित काही काळाने लग्न करु' असं माही गिलने स्पष्ट केलं.
ठाण्यातील घोडबंदर परिसरात 'फिक्सर' या वेब सिरीजचं शूटिंग सुरु असताना सेटवर काही गुंडांनी केलेल्या हल्ल्यातून माही थोडक्यात बचावली होती. तिने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement