एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णीला मिळालाय मोठा प्रोजेक्ट; वैभव मांगले अन् भार्गवी चिरमुलेसोबत गाजवणार रंगभूमी

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर निमिष कुलकर्णी आता पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहे.

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील जत्रेकरी अनेक सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजमध्येही काम करत आहेत. आता हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर निमिष कुलकर्णीला (Nimish Kulkarni) मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. 

'मर्डरवाले कुलकर्णी' (Murderwale Kulkarni) नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. हे विनोदी नाटक असून या नाटकात विनोदवीर निमिष कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 नोव्हेंबरला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. या नव्या विनोदी नाटकाची नाट्यरसिकांना उत्सुकता आहे.

निमिष कुलकर्णी रंगभूमी गाजवण्यास सज्ज!

'मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकाबद्दल एबीपी माझासोबत बोलताना निमिष कुलकर्णी म्हणाला,"मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकाचा वेगळा अनुभव आहे. विनोदी संहितेवर काम करताना नेहमीच मजा येते. हास्यजत्रेत आजवर वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. पण त्या सर्व भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मी या नाटकात करत आहे. भूमिका चॅलेजिंग असल्याने मजादेखील येत आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Nimish Kulkarni (@inimishk)

निमिष पुढे म्हणाला,"काहीतरी वेगळं नाटक असल्यामुळे लगेचच मी होकार दिला होता. वैभव मांडलेसोबत (Vaibhav Mangale) काम करतानाचा अनुभव खूप कमाल आहे. वैभव दादा खूप सुंदर गातो आणि मला गाणी ऐकायला आवडतात. आम्हा दोघांनाही गाणी ऐकायला प्रचंड आवडतात. अनेक किस्से आम्ही शेअर करतो. काम करतानाची तो खूप मदत करतो. तो प्रचंड क्रिएटिव्ह असल्याने नेहमीच त्याच्याकडून काहीतरी नवं शिकता येतं. हास्यजत्रा मी गेल्या पाच वर्षांपासून करत असल्याने ती माझी पहिली प्रायोरिटी आहे. पण नाटकाचे प्रयोग आणि हास्यजत्रा या दोन्ही गोष्टी मी करत राहणार आहे". 

'मर्डरवाले कुलकर्णी' नाटकाबद्दल जाणून घ्या...

विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या 24 नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल होतं आहे.

वैभव मांगले यात मध्यवर्ती भूमिकेत असून संतोष पवार यांच्या भन्नाट दिग्दर्शनाखाली या नाटकाचा पट रंगला आहे. निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.

संबंधित बातम्या

Namrata Sambherao : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी नम्रता संभेराव! जाणून घ्या 'लॉली'बद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Nitesh Rane Vastav 144 : नितेश राणेंबद्दल हिंदू, मुस्लीम खाटकांना काय वाटतं? : ABP Majha
Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Manikrao Kokate : मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
मी कधीही चुकीचे काम करत नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य; न्यायालयाच्या निरीक्षणावर स्पष्टच बोलले
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
बीडमध्ये शिक्षकाने संपवले जीवन; फेसबुक पोस्ट लिहल्याने उडाली खळबळ, पोलीस तपास सुरू
...तर राज्य अन् केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
...तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर राज्य अन् केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू; शरद पवरांकडून चिंता व्यक्त      
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
'योग अन् यज्ञ' हेच सनातन संस्कृतीचे प्राण तत्व; पतंजली विश्वविद्यालयात बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत होलिकोत्सव साजरा
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
Embed widget