Telly Masala : मुग्धा-प्रथमेशचं लग्न ते छोट्या पडद्यावर जुई गडकरीची हवा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Updates : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Mahesh Manjrekar : "पोपटराव पवारांचं मोठं काम, मात्र क्रेडीट आमिर खानचं पाणी फाऊंडेशन घेऊन जातं"; महेश मांजरेकरांचं वक्तव्य
Mahesh Manjrekar : मराठमोळे अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकत्याच एका कार्यक्रमात मांजरेकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "पोपटराव पवारांचं (Popatrao Pawar) काम मोठं आहे. पण क्रेडीट मात्र आमिर खानचं (Aamir Khan) पाणी फाऊंडेशन घेऊन जातं", असं वक्तव्य महेश मांजरेकरांनी केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serial : छोट्या पडद्यावर जुई गडकरीची हवा, 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टीआरपीच्या शर्यतीत जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : प्रथमेश लघाटेच्या 'या' गोष्टीच्या प्रेमात पडली मुग्धा वैशंपायन; प्रपोज कोणी केलं? जाणून घ्या...
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Wedding Update : 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितलं. आता युट्यूबवर एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल माहिती दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Satvya Mulichi Satavi Mulgi : टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठं रहस्यमय लग्न; अद्वैत-नेत्रा लवकरच अडकणार लग्नबंधनात
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial Latest Update : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत अद्वैत आणि नेत्राचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sangeet Devbabhali : मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक 'संगीत देवबाभळी' घेणार प्रेक्षकांचा निरोप
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' (Sangeet Devbabhali) हे मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक आहे. पाच वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची आजही क्रेझ कायम आहे. या नाटकाचे आजही हाऊसफुल प्रयोग पार पडत आहेत. पण आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.