Mahadev Online Book App : ज्यूस विक्रेता ते कोट्यवधींचा मालक; भिलाई टू यूएईपपर्यंतचा सौरभ चंद्राकरचा प्रवास कसा होता? जाणून घ्या...
Saurabh Chandrakar : सौरभ चंद्राकर यांचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई ते यूएईपर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घ्या...
Saurabh Chandrakar Story : महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणामुळे (Mahadev Online Gaming App) सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar) चर्चेत आला आहे. महादेव बुक अॅपचा मालक सौरभ चंद्राकरने UAE मध्ये झालेल्या त्याच्या लग्नासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्यामुळे तो नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सौरभ चंद्राकरच्या भव्य लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौरभ चंद्राकर यांचा छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई ते UAE पर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घ्या...
कोण आहे सौरभ चंद्राकर (Who is Saurabh Chandrakar)
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग पोलिसांनी दावा केला आहे की, सौरभ हा दुर्ग जिल्यातील भिलाईचा असून तो काही वर्षांपूर्वी ज्यूस कॉर्नरचा दुकान चालवत होता. कोरोनाकाळात त्याचे ज्यूसचे दुकान बंद झाले आणि त्यानंतर त्याने ऑफलाइन जुगार खेळण्यास सुरुवात केली. नंतर मित्र आणि सहआरोपी रवी उप्पलच्या मदतीतून तो हैदराबादमध्ये असलेल्या ऑनलाइन जुगारात व सट्टेबाजी उतरला. त्यानंतर तेथून ऑनलाइन सट्टेबाजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सौरभ चंद्राकरने हळूहळू ऑनलाइन सट्टेबाजीचा व्यवसाय दुर्गमधून संपूर्ण देशात पसरवला आणि कोट्यवधींची कमाई केली. दुसऱ्यासाठी काम करण्याऐवजी स्वत:चं काही तरी करू या विचाराने त्याने महादेव बुक अॅप नावाचे स्वतःचे ऑनलाइन जुगार व सट्टेबाजी अॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि इथे हा घोटाळा सुरू झाला.
सौरभ आता त्याच्या कुटुंबासह यूएईमध्ये (UAE) स्थायिक झाला आहे. सौरभचा ज्यूस विक्रेता ते कोट्यवधीपर्यंतचा प्रवास आणि आता पोलिसांना संशय आहे की त्यांनी 5000 कोटी या सर्व जुगार व गॅम्बलिंग मधून कमावलेले आहेत.
दुबईत पार पडलेल्या लग्नात चंद्राकरने 200 कोटी रुपये उधळले होते. त्यानंतर पूर्ण देशाचं लक्ष आता सौरभकडे असून आता तो तपास यंत्रणाचाच नाही तर गँगस्टरच्याही निशाण्यावर आलेला आहे. महादेव बुक अॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकरला याला गँगस्टर लॉरेंन्स बिष्णोईने धमकी देऊन खंडणी मागितली होती. मात्र चंद्राकरने यावर दुर्लक्ष केलं. चंद्राकरला अंडरवर्ल्डची साथ असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. बिष्णोईने हा कॉल तुरुंगातून केला होता असा पोलिसांना संशय आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिल्याने बिष्णोई आता नावारूपाला होता.
ईडीसुद्धा या प्रकरणातील मनी लॉन्ड्रीगचा तपास करत असून सौरभ याचा भव्य लग्नाला UAE इथे बॉलीवूड जे अभिनेता, अभिनेत्री व गायक उपस्थित होते व त्याचबरोबर काही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी महादेव बुक अँपचे प्रचार केले होते त्यांना चौकशीसाठी बोलवणार आहे . मात्र आता बॉलीवूडचे कोण कोणते प्रसिद्ध व्यक्ती ईडीच्या रडारवर आहेत हे पुढे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.
संबंधित बातम्या