Madhuri-Karisma Video: माधुरी आणि करिश्मा 'बलम पिचकारी' गाण्यावर थिरकल्या; नेटकरी म्हणाले, 'दिल तो पागल है-2'
माधुरी (Madhuri Dixit) आणि करिश्मा (Karisma Kapoor) यांनी नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
Madhuri-Karisma Video: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांच्या 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 1997 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. माधुरी आणि करिश्मा या 'दिल तो पागल है' चित्रपटामधील अभिनेत्रींनी नुकतेच एकमेकींसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
माधुरी आणि करिश्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दोघी 'बलम पिचकारी' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तसेच करिश्मा आणि माधुरी यांनी एकमेकींसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, , 'डांस ऑफ एनवी फ्रेंडशिप' करिश्मा आणि माधुरी यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
करिश्मा आणि माधुरी यांनी शेअर केलेल्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दिल तो पागल है-2' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'शाहरुख की ही कमी है बस।' , 'चक धुम धुम चक धुम अगेन' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावरील फोटोमध्ये माधुरी ही पिवळ्या रंगाच्या लाँग वनपिसमध्ये दिसत आहे. तर करिश्मा ही ब्राऊन अँड ब्लॅक वन पीस आणि डोळ्यांवर गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे. दोघींच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
माधुरी आणि करिश्माचे चित्रपट
करिश्मा ही लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की, वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. तर माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता माधुरीच्या आगामी चित्रपटांची चाहता उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या: