'मी बाथरुममध्ये धावत गेले आणि...'; नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनच्या शूटिंगचा अनुभव
एका मुलाखतीमध्ये नीना यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव सांगितला.
Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या गेल्या काही दिवसांपासून लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories-2) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नीना यांच्या या चित्रपटामधील अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. नीना या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नीना यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव सांगितला.
काय म्हणाल्या नीना गुप्ता?
नेटफ्लिक्सच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिला किसिंग सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल नीना गुप्ता यांनी सांगितलं, 'मी दिल्लगी या सीरिअलसाठी एक किसिंग सीन शूट केला होता. तो माझा पहिला किसिंग सीन होता. मी तो सीन करण्याआधी पूर्ण रात्र झोपले नव्हते. मी तेव्हा स्वत:ला सांगितलं की, तू अभिनेत्री आहेस, तू हे करु शकते. त्यानंतर मी किसिंग सीन शूट केला. तो सीन शूट केल्यानंतर मी धावत बाथरुममध्ये गेले आणि डेटॉलनं तोंड धूतलं. तो सीन प्रोमोमध्ये दाखवला जाणार आहे, असं मला कोणीतरी सांगतलं.पण तो सीन त्यांना सीरिअलमधून काढावा लागला.'
View this post on Instagram
नीना गुप्ता यांचे चित्रपट
अनुराग बसूचा मेट्रो इन दिनो, पछत्तर या चित्रपटांमधून नीना गुप्ता या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा लस्ट स्टोरीज-2 हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. नीना गुप्ता यांच्यासोबतच काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
नीना गुप्ता यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. नीना गुप्ता यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: