Lucky Ali Controversy: फेसबुक पोस्टमुळे लकी अली अडकला वादाच्या भोवऱ्यात; माफी मागत म्हणाला, 'माझे हिंदू भाऊ बहीण..'
एका फेसबुक पोस्टमुळे गायक लकी अली (Lucky Ali) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ती पोस्ट लकी अलीनं डिलीट केली.
Lucky Ali Controversy: बॉलिवूड गायक, संगीतकार लकी अली (Lucky Ali) हा सध्या त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लकी अलीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम यावरून झाल्याचा दावा केला होता. आता या पोस्टमुळे लकी अली वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ती पोस्ट लकी अलीनं डिलीट केली. या पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादामुळे लकी अलीनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.
लकी अलीची पोस्ट
लकी अलीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांची माफी मागितली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'मी शेअर केलेल्या पोस्टमुळे निर्माण झालेल्या कॉन्ट्रोव्हर्सीची मला जाणीव आहे. कोणताही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. मला याचा खूप पश्चाताप होत आहे. सर्वांना जवळ आणण्याचा माझा हेतू होता, पण मला जे हवे होते ते घडले नाही हे मला जाणवले. सोशल मीडियावर पोस्ट करताना मी काळजी घेईन, यामुळे माझे काही हिंदू भाऊ बहीण नाराज झाले. मी सर्वांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.' लकी अलीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
9 एप्रिल 2023 रोजी लकी अलीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले, 'ब्राह्मण हे नाव 'ब्रह्मा' वरून आले आहे जे नाव 'अब्राम' पासून तयार झाले आले आहे, जे अब्राहम किंवा इब्राहिमपासून आले आहे.'. या पोस्टमुळे अनेकांनी लकी अलीला ट्रोल केले. लकी अलीनं ही पोस्टनंतर डिलीट केली.
लकी अलीच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
लकी अली यांचे ‘ओ सनम’ हे गाणे आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या गाण्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली.रणबीर कपूर, दीपिका पदुकोण अभिनित ‘तमाशा’ या चित्रपटातील ‘सफरनामा’ हे गाणे लकी आली यांनी गायले आहे. तसेच लकी अलीनं काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यानं ‘कांटे’ आणि ‘सूर’ या चित्रपटातही काम केले होते. या दोन्ही चित्रपटातील भूमिकांमधून त्यांना खूप वाहवा मिळाली. ‘आ भी जा...’ ,कितनी हसीन जिंदगी, ना तुम जानो ना हम या लकी अलीच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Happy Birthday Lucky Ali : ‘कितनी हसीन जिंदगी..’ ते ‘ओ सनम’, बहारदार गाण्यांची मैफल जमवणारे लकी अली!