एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच
'लव्हरात्री' चित्रपटातून सलमान खान मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे, तर अभिनेत्री वरिना हुसैन त्याच्यासोबत पदार्पण करत आहे.
![वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच Loveratri teaser : Salman Khan launches teaser of Aayush Sharma, Warina Hussain starrer movie latest update वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चा टीझर सलमानकडून लाँच](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/14161839/Loveratri-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सलमान खानने 'लव्हरात्री' चित्रपटाचा टीझर ट्विटरवर शेअर केला आहे. या सिनेमातून सलमान मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे, तर अभिनेत्री वरिना हुसैन त्याच्यासोबत पदार्पण करत आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.
सलमानच्या 'लव्हरात्री'तून मेहुणा आयुष शर्माचं पदार्पण
इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्वीट करत सलमानने टीझर शेअर केला आहे. '#LoveratriTeaser' सोबत प्रेमाच्या रंगात रंगून जाण्यास सलमान चाहत्यांना सांगत आहे.सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हरात्री' या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. 5 ऑक्टोबर 2018 रोजी 'लव्हरात्री' प्रदर्शित होणार आहे.प्यार मे खो जाओ #LoveratriTeaser के संग| https://t.co/61GUTtZzSO @aaysharma @Warina_Hussain @abhiraj21288 @SKFilmsOfficial #LoveratriTeaser
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 14, 2018
मुलगी मिळाली पण..., सलमान खानचं ट्विटरवरुन स्पष्टीकरण
लव्हरात्री हा चित्रपट आयुष शर्मासाठी मोठा ब्रेक मानला जात आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना अहिल हा मुलगा आहे. वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चं पोस्टर सलमानकडून रिलीज
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)