Leo Trailer: थलापती विजयच्या ‘Leo’च्या ट्रेलर स्क्रिनिंग दरम्यान प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्यांची केली तोडफोड; चित्रपटगृहातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
Leo Trailer: लियो या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या ट्रेलरच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले होते.
Leo Trailer: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपथी विजयच्या (Thalapathy Vijay) बहुप्रतिक्षित 'लियो' (Leo) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये थलपथी विजय आणि अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे काही अॅक्शन सीन्स दिसत आहेत. लियो या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या ट्रेलरच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले होते. लियो चित्रपटाचं स्क्रिनिंग झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्यांची तोडफोड केली आहे.
प्रेक्षकांनी थिएटरमध्ये केली तोडफोड
चेन्नईतील रोहिणी या थिएटरमध्ये लियो या थलपथी विजयच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला विजयच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली. रिपोर्टनुसार, लियो चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्या आणि काचेच्या भिंती तोडल्या.
Rohini Cinemas completely thrashed by Joseph Vijay fans after #LeoTrailer screening. pic.twitter.com/vQ9sd6uvJg
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) October 5, 2023
मनोबाला विजयबालन यांनी नुकतेच रोहिणी थिएटरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "लिओ ट्रेलरच्या स्क्रिनिंगनंतर विजयच्या चाहत्यांनी रोहिणी सिनेमागृहातमध्ये तोडफोड केली."
लियो कधी होणार रिलीज?
'लियो' हा चित्रपट 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट तमिळ भाषेत बनवलेले आहे. तसेच तेलुगू आणि हिंदी भाषांमध्येही हा चित्रपट रिलीज होणार आहे. थलपथी विजय आणि संजय दत्त व्यतिरिक्त या चित्रपटात त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत. सेन्सॉर बोर्डानं 'लियो' या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. लोकेश कानगराज यांनी 'लियो' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लियो या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
थलपथी विजयचे चित्रपट
लव्ह टुडे,पूवे उनाक्कागा , प्रियामुदन,थुल्लाधा मनामुम थुल्लुम, कधालुक्कू मरियाधाई ,थुप्पक्की,कठ्ठी या थलपथी विजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Vijay’s LEO First Look: वाढदिवसाला विजयनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; 'लियो' चा फर्स्ट लूक रिलीज