Laal Singh Chaddha : 'आमिरला ट्रोल करण्यासाठी दिले जातायत पैसे'; बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर दिग्दर्शक अद्वैत चंदनची प्रतिक्रिया
बायकॉट लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) ट्रेंडवर प्रसिद्ध दिग्दर्शक अद्वैत चंदनने (Advait Chandan) प्रतिक्रिया दिली आहे.
Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या आमिर आणि करीना या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बायकॉट लाल सिंह चड्ढा हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर प्रसिद्ध दिग्दर्शक अद्वैत चंदनने (Advait Chandan) प्रतिक्रिया दिली आहे.
अद्वैत चंदनची पोस्ट
दिग्दर्शक अद्वैत चंदनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लाल सिंह चड्ढा चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांवर आणि आमिर खानवर निशाणा साधला आहे. अद्वैत चंदन यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिलं, आमिरला ट्रोल करणाऱ्या ट्रोल आर्मीला पैसे दिले जातात. हे खूप चुकीची गोष्ट आहे. मी त्याला फ्रीमध्ये का ट्रोल करु? ‘पे एव्हरी ट्रोल’ या हॅशटॅगचा वापर अद्वैत चंदननं या पोस्टमध्ये केला आहे.
आमिरनं दिली होती प्रतिक्रिया
'काही लोकांना वाटतं की मला भारत देश आवडत नाही, या गोष्टीचं मला दु:ख होतं. पण मला हे सांगायचं आहे की ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये आणि कृपया थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा.' अशी प्रतिक्रिया आमिरनं बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर दिली होती.
बऱ्याच दिवसांपासून आमिरनं मोठ्या पडद्यावरुन ब्रेक घेतला होता. आता तो लाल सिंह चड्ढा चित्रपटामधून कम-बॅक करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा इतर बातम्या: