Laal Singh Chaddha Trailer : इतिहास घडणार... भल्या-भल्या सिनेमांना मागे टाकणार? आमिर खानचा 'मास्टरपीस' लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर प्रदर्शित
Laal Singh Chaddha Trailer : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Laal Singh Chaddha Trailer : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
लाल सिंह चड्ढाचा जीवनप्रवास उलगडणार
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात लाल सिंह चड्ढा नावाच्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवला आहे. या सिनेमात आमिरने अनेक भूमिका साकारल्याचे ट्रेलरवरून दिसते आहे. ट्रेलरच्या शेवटी आमिर पळताना दिसतो आहे. आमिर का पळतोय हे प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.
11 ऑगस्टला सिनेमा होणार प्रदर्शित
'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमादरम्यान सिनेमातील आमिर खानसह सिनेमातील अनेक कलाकार स्टेडियममध्ये उपस्थित होते.
आयपीएल 2022 च्या फायनलदरम्यान सिनेमाचा ट्रेलर लॉंच
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल 2022 च्या फायनलचा थरार सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइन आऊटवेळी आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या सिनेमात करिना आणि आमीरसोबतच अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंह देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झाले आहे. लाल सिंह चड्ढा हा टॉम हँक्स आणि रॉबिन राइट यांच्या फॉरेस्ट गंप या हिट चित्रपटाचा रिमेक आहे. आमिर खान, किरण राव आणि वायकॉम 18 स्टूडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या