एक्स्प्लोर

Kshitij Patwardhan : "गौरी सावंतच्या कहाण्या ऐकून कधी रडलो कधी घाबरलो"; 'ताली'चा लेखक क्षितिज पटवर्धनची पोस्ट चर्चेत

Kshitij Patwardhan : 'ताली' या आगामी वेबसीरिजचा लेखक क्षितिज पटवर्धनने या सीरिजच्या पडद्यामागील आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट लिहिली आहे.

Kshitij Patwardhan ON Taali Web Series : 'ताली' (Taali) ही आगामी वेबसीरिज सध्या चर्चेत आहे.  अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या सीरिजमध्ये गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भूमिका साकारली आहे. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) केलं आहे. आता या सीरिजच्या पडद्यामागील आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट त्याने लिहिली आहे.

क्षितिजने लिहिलं आहे,"2014-15 ला पुणं सुटलं. कट्टे सुटले, गप्पा सुटल्या, मुंबईत असं चालतं याच्या ऐकीव चर्चा सुटल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अनेक लोकांच्या माझ्याबद्दलच्या समजातून, ग्रहातून सुटलो. एक म्हणजे मुंबईत अजून वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायची तीव्र इच्छा होती आणि दुसरं पुण्यात सुखवस्तू, गोड आणि एकाच प्रकारच्या गोष्टी करून कंटाळलो होतो. मुंबईतली ही पुढची वर्ष आपल्याला आव्हान देणाऱ्या कथा शोधण्यात गेली. त्यात काही फसली, काही वर्क झाली".

View this post on Instagram
 
A post shared by Kshitij Patwardhan (@kshitijpatwardhan)

'ताली' या सीरिजच्या प्रवासाबद्दल बोलताना क्षितिज म्हणाला,"2019 च्या सुरुवातीला असंच हे आव्हान आलं, गौरी सावंत यांच्या आयुष्यावर मराठी सिनेमा काढायचं. आजवर तृतीयपंथी समाजाला आपल्या सिनेमात बीभत्स, नकारात्मक किंवा विनोदी याच पठडीत सादर केलं गेलंय. मला वाटलं ही ते मोडायची खूप चांगली संधी आहे, कारण ही एका मुलाची गोष्ट आहे ज्याला आई व्हायचंय! ही एका आईची गोष्ट आहे, जी तृतीयपंथी आहे. निर्माती अफीफा नाडियादवाला हिने जबरदस्त पाठपुरावा करून हे मार्गी लावलं, आणि मी आणि समीर मिळून धुरळा नंतर ही गोष्ट मराठी करणार अशी अनाउन्समेंट सुद्धा झाली. 

गौरी सावंतच्या कहाण्या ऐकून कधी रडलो कधी घाबरलो : क्षितिज पटवर्धन

क्षितिजने पुढे लिहिलं आहे,"गौरीला भेटलो आणि तिच्या एकेक कहाण्या ऐकून कधी रडलो, कधी थक्क झालो, कधी घाबरलो सुद्धा. ज्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नाही ती गोष्ट ती जगलीये, आणि आपल्याला त्या बद्दल लिहायचंय हे खूप मोठं आव्हान होतं. आख्खा मराठी सिनेमा लिहिला, त्याचं प्रेसेंटेशन तयार केलं, खूप लोकांना पाठवलं, अभिनेत्यांची नावं काढली, पुढचे ६ महिने उत्तराची फक्त वाट पाहिली, मग पहिला धक्का बसला... Lockdown नावाचा... या प्रोसेसमध्ये शिकायला हे मिळालं की तुम्ही कितीही पटकन लिहिलं तरी लोकं ते पटकन वाचत नाहीत, ते त्यांच्या वेळेने, सोयीने, आणि सवडीने त्यावर व्यक्त होतात आणि व्यक्त झाले म्हणजे ते करतात असं नाही. एखाद्या स्क्रिप्ट वर 'Interesting' हा शब्द 'नाही' पेक्षा धोकादायक आहे हे कळलं ते याच वेळी!".

संबंधित बातम्या

Gauri Sawant: आधी घरातून हकललं, मग वडिलांनी केले अंत्यसंस्कार... आयुष्यातील ही घाव सोसून गौरी सावंतने निर्माण केली आपली ओळख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget