एक्स्प्लोर

Kriti Sanon : प्रभासला सोडलं अन् 10 वर्ष लहान उद्योगपतीला डेट करतेय कृती सेनन; मिस्ट्री मॅनचं 'कॅप्टन कूल' धोनीसोबत आहे खास कनेक्शन

Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेननचं नाव 'बाहुबली' फेम प्रभाससोबत जोडलं गेलं होतं. अशातच आता तिचं नाव आणखी एका वेगळ्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीसोबत (Mahendra Singh Dhoni) या व्यक्तीचं खास कनेक्शन आहे.

Kriti Sanon Rumoured Boyfriend : बॉलिवूडची हॉट अँड ब्युटीफुल अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या सिनेमात शेवटची झळकली होती. या रोमँटिक नाट्यमय सिनेमात कृती सेननसोबत शाहिद कपूर (Shahid Kapoor) मुख्य भूमिकेत दिसला होता. या सिनेमातील अभिनेत्रीने परफॉर्मेंसने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. कृती सेनन आपल्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. कृती तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळेदेखील अनेकदा चर्चेत आली आहे. कृतीचं नाव आधी 'बाहुबली' (Baahubali) फेम प्रभाससोबत (Prabhas) जोडलं जात होतं. आता तिचं नाव एका वेगळ्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. बी-टाऊनमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. आता कृती सेननचा रुमर्ड बॉयफ्रेंड नक्की कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मिस्ट्री मॅनसोबतचा कृती सेननचा फोटो व्हायरल (Kriti Sanon Photo Viral)

कृती सेननचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या फोटोमध्ये कृती एका मुलाचा हात पकडून लंडनच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसून येत आहे. कृतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हा दुसरा-तिसरा कोणी नसून कृती सेननचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे, असं म्हटलं जात आहे. कृतीसोबत असलेल्या मुलाचं नाव 'कबीर बहिया' (Kabir Bahia) असं आहे. कबीर ब्रिटनमध्ये राहणारा आहे. कबीर हा कृतीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. कबीरचे वडिल लंडनचे एक लोकप्रिय उद्योगपती आहेत.

Kriti Sanon : प्रभासला सोडलं अन् 10 वर्ष लहान उद्योगपतीला डेट करतेय कृती सेनन; मिस्ट्री मॅनचं 'कॅप्टन कूल' धोनीसोबत आहे खास कनेक्शन

महेंद्र सिंह धोनीसोबत खास कनेक्शन

कृती सेननचं नाव कबीर बहियासोबत जोडलं गेलं आहे. कबीर बहिया आणि भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबत (Mahendra Singh Dhoni) कृतीचं नाव जोडलं गेलं आहे. महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीसोबतच्या (Sakshi Dhoni) अनेक फोटोंमध्ये कबीर दिसून आला आहे. कबीर आणि साक्षीचं खास नातं आहे. अद्याप कृती सेनन किंव कबीर बहिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. कृती सेननचं नाव याआधी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत जोडलं गेलं होतं. प्रभास आणि कृती सेननच्या अफेअरच्या चर्चा 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाच्या सेटवर सुरू झाल्या होत्या. 

कृतीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव 

कृती सेननच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कबीर भाऊ खूपच आकर्षक आहे, कृती आणि कबीर एकमेकांना डेट करत आहेत, कृतीला अखेर चांगला जोडीदार मिळाला आहे, कृतीच्या लग्नाची आता प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.  

कृती सेनन सध्या तिच्या 'क्रू' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 29 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'क्रू' या सिनेमात तब्बू, करीना कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसणार आहे. राजेश कृष्णनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिया कपूर, एकता कपूर, अनिल कपूर आणि दिग्विजय पुरोहित या सिनेमाचे निर्माते आहेत. 

संबंधित बातम्या

Crew Choli Ke Peeche song : 'पुन्हा एका गाण्याची वाट लावली', 'चोली के पिछे क्या हैं' गाण्यामधील करिनाच्या अंदाजावर प्रेक्षकांची नापसंती, माधुरीसोबत तुलना करत म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे
क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे
Donald Trump on Tesla : हे तर दहशतवादी कृत्य! अमेरिकेतील टेस्ला कार पेटवापेटवीवर डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, आता जर कोणी टेस्ला कार पेटवली तर..
हे तर दहशतवादी कृत्य! अमेरिकेतील टेस्ला कार पेटवापेटवीवर डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, आता जर कोणी टेस्ला कार पेटवली तर..
Nashik Crime : स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Babar Azam : नेट बॉलरने केला बाबर आझमचा करेक्ट कार्यक्रम, पंचांनी बाद देताच बाबरला काहीच सुचेना, फक्त...
बाबर आझमचे बुरे दिन सुरुच, नेट बॉलरनं केला करेक्ट कार्यक्रम, पाकिस्तानी खेळाडू पाहातच राहिला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajit Sawant PC : प्रशांत कोरटकर चिल्लर, हातावर तुरी देत पळून गेला असेल तर हे गृह खात्याचं अपयशABP Majha Headlines : 12 PM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 22 March 2025 :  ABP Majha : 12 PMPrashant Koratkar Photos : जुने फोटो टाकून पोलिसांची दिशाभूल? प्रशांत कोरटकरचा प्रशासनाला चकवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे
क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे
Donald Trump on Tesla : हे तर दहशतवादी कृत्य! अमेरिकेतील टेस्ला कार पेटवापेटवीवर डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, आता जर कोणी टेस्ला कार पेटवली तर..
हे तर दहशतवादी कृत्य! अमेरिकेतील टेस्ला कार पेटवापेटवीवर डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, आता जर कोणी टेस्ला कार पेटवली तर..
Nashik Crime : स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने 'हॅपी होली' म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
Babar Azam : नेट बॉलरने केला बाबर आझमचा करेक्ट कार्यक्रम, पंचांनी बाद देताच बाबरला काहीच सुचेना, फक्त...
बाबर आझमचे बुरे दिन सुरुच, नेट बॉलरनं केला करेक्ट कार्यक्रम, पाकिस्तानी खेळाडू पाहातच राहिला...
Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
Embed widget