Kirti Kharbanda New Car: कृती खरबंदानं घेतली आलिशान कार; किंमत वाचून डोळे विस्फारतील
कृतीनं (Kirti Kharbanda) नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. जाणून घेऊयात तिच्या या नव्या कारबद्दल...

Kirti Kharbanda New Car: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कृती खरबंदानं (Kirti Kharbanda) अनेक हिट चित्रपटामध्ये काम केलं. कृती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. कृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. कृतीनं नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. जाणून घेऊयात या कारबद्दल...
कृती खरबंदानं नुकतीच आलिशान गाडी घेतली आहे. कृतीनं लँड रोव्हर रेंज रोव्हर वेलार 2.0 आर-डायनॅमिक एस डिझेल ही आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास 89.41 लाख रुपये आहे, असं म्हटलं जात आहे. कृतीचे या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये ती क्रॉप टॉप आणि ब्राऊन पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. कृतीच्या नव्या कारच्या व्हायरल फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत
कृती ही तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, कृतीला पोल डान्सची देखील आवड आहे. अनेकदा कृती ही तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. कृतीला इन्स्टाग्रामवर 8 मिलियन फॉलोवर्स आहेत. इन्साग्रामवर ती विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram
कृतीचे चित्रपट
क्रिती खरबंदा हिने इमरान हाश्मीसोबत विक्रम भट्टच्या राज रिबूट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'गेस्ट इन लंडन', 'शादी में जरूर आना', 'यमला पगला दीवाना: फिर से' यांसारख्या चित्रपटात कृतीनं काम केलं. देवांशू सिंग दिग्दर्शित '14 फेरे' या चित्रपटात विक्रांत मॅसीसोबत देखील काम केलं. 'बोनी', 'चिरू', 'तीन मार', 'ओम थ्रीडी', 'तिरुपती एक्सप्रेस', 'सुपर रंगा' या साऊथ चित्रपटांमध्येही तिनं प्रमुख भूमिका साकारली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:























