Konkona Sen Sharma : "अॅनिमल' माझ्या टाइपचा चित्रपट नाही"; रणबीरचा सिनेमा न पाहिल्याबद्दल कोंकणा सेन शर्माचा खुलासा
Konkona Sen Sharma : अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने अद्याप रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा पाहिलेला नाही. अभिनेत्रीने याबद्दल खुलासाही केला आहे.
Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. एकीकडे या टीका होत असताना दुसरीकडे मात्र या सिनेमाचं आणि रणबीरच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पण अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने (Konkona Sen Sharma) अद्याप 'अॅनिमल' हा सिनेमा पाहिलेला नाही.
'अॅनिमल' (Animal) हा रणबीरच्या करिअरमधला ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy vanda) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे हा महिला विरोधी सिनेमा असल्याचं म्हटलं गेलं.
बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा सध्या 'किलर सूप' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये ती मनोज वाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सीरिजचं प्रचंड कौतुक होत आहे. अभिनेत्री सध्या या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तिने रणबीरच्या 'अॅनिमल'बद्दल भाष्य केलं आहे.
कोंकणा सेन शर्माने पाहिला नाही रणबीरचा 'अॅनिमल' (Konkona Sen Sharma on Ranbir Kapoor Animal)
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कोंकणा सेन शर्मा म्हणाली,"काहीही कारण नसताना रुपेरी पडद्यावर हिंसा दाखवणं योग्य नाही. इंटीमेट सीन्ससंदर्भातही ही गोष्ट लागू होते. कथानकाला पुढे घेऊन जाण्यासाठी हिंसा किंवा इंटीमेट सीन्स दाखवले असतील तर माझा काही आक्षेप नाही. सिनेमात ते सीन ठेवायला काही ठोस कारण असायला हवं".
कोंकणा सेन शर्मा पुढे म्हणाली,"मी आतापर्यंत 'अॅनिमल' हा सिनेमा पाहिलेला नाही. 'अॅनिमल' हा माझ्या पद्धतीचा सिनेमा नाही, असं मला वाटतं. व्यूज आणि कौतुक ऐकूनही हा सिनेमा पाहायला जावं, असं मला वाटलं नाही. लाखो लोक या सिनेमाचं कौतुक करत आहेत. संदीप रेड्डी यांच्या कामाचा मला अंदाज आहे".
रणबीरच्या 'अॅनिमल'बद्दल जाणून घ्या... (Animal Movie Details)
अॅनिमलला या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. संदीप रेड्डी वांगाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीर, रश्मिकासह बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 900 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा सिनेमा 1000 कोटींचा गल्ला जमवेल.
संबंधित बातम्या