Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले असून वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करताना त्या दिसून आल्या.
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत.
'या' कारणाने काजोल अन् राणी मुखर्जीमध्ये होता अबोला
करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता".
View this post on Instagram
राणी मुखर्जी म्हणाल्या,"काजोलला मी लहानपणापासून ओळखते. ती माझ्यासाठी काजोल दीदी होती. मोठं होत असताना आमच्यात कसा दुरावा आला हे मला माहिती नाही. आम्ही साधं एकमेकींना भेटलोदेखील नाही. काजोल दीदी शहरात राहायची आणि आम्ही जुहूमध्ये. आमच्या कुटुंबात मी आणि तनीशा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. आजही आमची छान मैत्री आहे. पण कुटुंबातील भावांसोबत काजोलचं जास्त पटायचं. हे थोटं विचित्र होतं".
'या' कारणाने रानी अन् काजोल बोलू लागल्या...
काजोल म्हणाली की,"वडिलांच्या निधनानंतर मी आणि राणी एकमेकींसोबत बोलू लागलो". रानी म्हणाली,"कुटुंबातील तुमच्या लाडक्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही जमावता तेव्हा तुमचं मोठं नुकसान झालेलं असतं. त्यावेळी तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ येता. काजोलचे वडील शोमू मुखर्जी आणि माझं खूप घट्ट नातं होतं".
काजोल आणि राणी मुखर्जी नुकतेच 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. काजोल आणि राणी मुखर्जीचा हा भाग खूपच स्पेशल होता. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा भाग पाहता येईल.
संबंधित बातम्या