Koffee With Karan 8: सनी देओलबद्दल श्रीदेवींची लेक असं काही बोलली की करणही शॉक झाला
Koffee With Karan Season 8: जान्हवीच्या एका वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. शोमध्ये सनी देओलचं नाव घेतल्यानंतर जान्हवीनं दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Koffee With Karan Season 8: कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या कार्यक्रमाचा आठवा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या एपिसोडमध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी हजेरी लावली आहे. जान्हवी आणि श्रीदेवी यांनी कॉफी विथ करणमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली. कॉफी विथ करणमधील जान्हवीच्या एका वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. शोमध्ये सनी देओलचं (Sunny Deol) नाव घेतल्यानंतर जान्हवीनं दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सनी देओलबद्दल काय म्हणाली जान्हवी?
कॉफी विथ करण या शोमध्ये एका फोटो गेमचा राऊंड सुरु होता. या राऊंडमध्ये जान्हवीला एका खुशी आणि तिच्या फोटोमधील मिसिंग वस्तू ओळखायची होती. या फोटोमधील टेडी गायब करण्यात आला होता. जान्हवीनं त्या टेडीबद्दल सांगितल्यानंतर करण म्हणाला, सनी देओलने शोमध्ये सांगितले होते की, त्याला टेडी बेअर्स खूप आवडतात. यावर जान्हवीने तिच्या क्यूट अंदाजात सांगितले की, सनी देओल तिला टेडी बेअरसारखाच वाटतो. त्यानंतर करण शॉक होतो. ते हसत जान्हवीला म्हणतो, 'खरंच? तुला सनी देओल टेडी बेअरसारखा वाटतो?'
त्यानंतर करणला जान्हवी म्हणते, "मला त्यांना मिठी मारावीशी वाटते. मला माहित नाही की, त्यांना हे कसे वाटेल पण मला त्यांना मिठी मारावीशी वाटते." त्यानंतर जान्हवी, खुशी आणि करण हसतात.
View this post on Instagram
जान्हवीनं कॉफी विथ करणमध्ये तिचे काका अनिल कपूर यांची मिमिक्री देखील केली. तसेच तिनं शोमधील रॅपिड फायर राऊंडमधील विविध प्रश्नांची उत्तर देखील दिली.
सनी देओल आणि बॉबी देओल यांनी काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. तसेच दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन,सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर या सेलिब्रिटींनी देखील या शोमध्ये हजेरी लावली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: