Kishori Shahane : नाचणीची भाकरी, सुरमई फ्राय.. अभिनेत्री किशोरी शहाणेंनी चुलीवर बनवलं जेवण; पाहा व्हिडीओ
Kishori Shahane : अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी चुलीवर जेवण बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Kishori Shahane : मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) सध्या चर्चेत आहेत. पण सध्या त्या कोणत्या कलाकृतीमुळे चर्चेत आलेल्या नसून त्यांच्या एका कृतीने चर्चेत आल्या आहेत. किशोरी शहाणे यांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
किशोरी शहाणेंनी शेअर केला जेवण बनवतानाचा व्हिडीओ (Kishori Shahane Shared Cooking Video)
किशोरी शहाणे यांनी जेवण बनवताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या चुलीवर जेवण बनवताना दिसत आहेत. किशोरी यांनी त्यांच्या फार्महाऊसवर चुलीवर जेवण बनवलं आहे. किशोरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या तव्यावर सुरमई फ्राय करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी भाकरीदेखील बनवली आहे. व्हिडीओमध्ये त्या मस्त झालं आहे..खायला या असं चाहत्यांना सांगत आहेत.
View this post on Instagram
किशोरी शहाणे यांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"चला जरा चुलीवरचं जेवण करूया, मासे आणि नाचणीची भाकरी". किशोरी शहाणे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मस्तच, नॉनव्हेजचा बेत असला की चुलीवरच जेवण बनवायला हवं, एक नंबर, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
किशोरी शहाणेंबद्दल जाणून घ्या... (Who is Kishori Shahane)
किशोरी शहाणे या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनेत्री असण्यासोबत त्या नृत्यांगना आणि सिने-निर्मात्याही आहेत. अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. एक डाव धोबीपछाड, नवरा माझा नवसाचा, माहेरची साडी अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. मोरूची मावशी, दुर्गा झाली गौरी, भ्रमाचा भोपळा आणि मी तुझ्या पाठीशी आहे, या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमी गाजवली आहे.
किशोरी शहाणे यांनी 'दुर्गा झाली गौरी' या नाटकाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. पण माहेरची साडी आणि वाजवा रे वाजवा या सिनेमांच्या माध्यमातून त्यांना लोकप्रियता मिळाली. ऐका दाजिबा या सिनेमाची निर्मितीदेखील त्यांनी केली आहे. किशोरी शहाणे यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या