Kiran Mane : "आता आरक्षणातच माझा राम आणि मुंबई हीच अयोध्या", मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर किरण माने यांची पोस्ट
Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची खरमरीत पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Kiran Mane Post on Manoj Jarange Maratha Reservation : मराठी आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा देशभरात चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत. दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या खरमरीत पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किरण माने याआधी साताऱ्यातील साखळी उपोषणात सहभागी झाले होते.
किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post)
किरण माने यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या." अशी मागणी करत लाख्खोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडला आहे. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरू आहे. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलं आहे".
View this post on Instagram
आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या : किरण माने
किरण माने यांनी लिहिलं आहे,"वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत. मी फोन केला,"तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या. लोकांनी घरात बसुन टीव्हीवर राममंदिराचा सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिली सगळ्यांना. नातवंडं, पाहुणे आलेत. एकत्र मिळून बघा." ते म्हणाले, "नाही. ते बघून काय मिळनारंय? महागाई कमी हुनारंय का आपल्या पोरांना रोजगार मिळनारंय? आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या. नातवंडांसाठीच मी हे करतोय. आम्ही दुसर्याच्या ताटातला घास हिसकावून घेत नाही. आमचा हक्काचा आमच्या नातवंडांच्या मुखात पडायला हवा".
किरण माने पुढे म्हणाले,"मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित, मुस्लिम, धनगर, माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय. ग्राऊंड लेव्हलवरचा बहुजन फुटलेला नाही, हे आशादायी चित्र आहे. राजकीय चित्र काहीही दाखवूदेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की 'एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन. महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम. जय शिवराय जय भीम".
किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक मराठा लाख मराठा, महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम, जय शिवराय जय भीम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या