Kiara Advani Sidharth Malhotra Wedding : सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात चर्चा रंगली नववधूच्या दागिन्यांची; जाणून घ्या 'ब्राइडल लूक'बद्दल...
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'ब्राइडल लूक' खूपच खास होता. तिच्या वेडिंग लूकने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
Kiara Advani Bridal Jewellery : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंनधात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींसह चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात नववधूच्या दागिन्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.
कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील एकमेकांसोबतचे (Kiara Advani Sidharth Malhotra) रोमॅंटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. लग्नसोहळ्यातील कियाराचा लूक चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
कियाराच्या दागिन्यांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
कियाराने लग्नात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाईन केलेला गुलाबी रंगाचा (Rose Pink) लेहेंगा परिधान केला होता. डिझायनर लेहेंग्यासोबत नववधूच्या दागिन्यांनी (Bridal Jewellery) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कियाराने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले दागिने घातले होते. कियाराची हे दागिने अल्ट्रा-फाईन हॅंडकट हिऱ्यांपासून बनवण्यात आले आहेत. हे दागिने मनीषने खास कियारासाठी बनवले होते. लेहेंग्याच्या रंगाशी जुळणाऱ्या गुलाबी रंगाच्या बांगड्यादेखील खूप हटके होत्या.
View this post on Instagram
सिड-कियाराचं ग्रॅंड रिसेप्शन! (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Reception)
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या शाही विवाहसोहळ्यानंतर त्यांच्या ग्रॅंड रिसेप्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिड-कियाराच्या रिसेप्शन मुंबईत होणार असं म्हटलं जात होतं. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियाराचं ग्रॅंड रिसेप्शन मुंबई आणि दिल्ली अशा दोन ठिकाणी होणार आहे. 9 फेब्रुवारीला दिल्लीत रिसेप्शन झाल्यानंतर सिड-कियारा मुंबईला रवाना होणार आहेत. तर 12 फेब्रुवारीला मुंबईत ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. थोड्याच दिवसात सिद्धार्थ-कियारा आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
लग्नानंतर वेडिंग कार्ड व्हायरल... (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Card Viral)
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्यात 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे मेहंदी, संगीत, हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नाहीत. पण आता लग्नानंतर त्यांची लग्नपत्रिका (Wedding Card) व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या