Khurchi Motion Poster Out: "सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच!"; 'खुर्ची' चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Khurchi Motion Poster Out: ‘खुर्ची’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Khurchi Motion Poster Out: ‘खुर्ची’ (Khurchi) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुर्ची’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांची आतुरता पाहून नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘खुर्ची’ या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर देखील सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. या मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडताना दिसला आहे. तर, लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करत आहे. पार्श्वभूमीवर दमदार संवाद आणि गाणं ऐकू येत आहेत. तर, या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची आहे. ढोल ताशे आणि माणसांच्या इतक्या गर्दीतही ही सत्तेची ‘खुर्ची’ मात्र सोन्यासारखी चमचमत आहे.‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खुर्चीसोबतच ‘आता खुर्ची आपलीच’ म्हणत चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे.
पाहा मोशन पोस्टर
View this post on Instagram
संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे आणि योगिता गवळी यांनी बरोबरीने सांभाळली आहे. ‘खुर्ची’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे.
‘खुर्ची’ चित्रपटाची स्टार कास्ट
‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, एस. आर्यन, राकेश बापट,अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री आराधना शर्मा यांच्या विशेष भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची गाणी प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून, त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे. तर आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी आपल्या सुमुधुर आवाजाने या चित्रपटासाठी गायन केले आहे.
‘खुर्ची’ हा चित्रपट सहनिर्माता प्रदीप नत्थीसिंग नागर, आतिश अंकुश जवळकर आणि डॉ. अमित बैरागी यांची सहनिर्मिती असून, राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. तर, राजीव पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांचे असून, दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. राहुल रामपाल या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करत आहेत. तर, क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
PHOTO | 'डॅडीं'चा जावई सत्तेच्या 'खुर्ची'त; चित्रपटात दिसणार ग्रामीण राजकारणाचा न पाहिलेला पैलू