Kho Gaye Hum Kahan Trailer : तीन मित्र, प्रेम अन् ब्रेकअप; 'खो गए हम कहां'चा ट्रेलर रिलीज
Kho Gaye Hum Kahan : 'खो गए हम कहां' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Kho Gaye Hum Kahan : बॉलिवूडच्या बहुचर्चित 'खो गए हम कहां' (Kho Gaye Hum Kahan) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. तीन मित्र, प्रेम आणि ब्रेकअपची गोष्ट असणाऱ्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने आता या सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
'खो गए हम कहां' या सिनेमात अनन्या पांडे (Ananya Panday), आदर्श गौरव (Adarsh Gourav) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 'खो गए हम कहां'चा ट्रेलर खूपच दमदार दिसतो आहे.
'खो गए हम कहां'चा ट्रेलर आऊट! (Kho Gaye Hum Kahan Trailer Out)
'खो गए हम कहां'च्या ट्रेलरमध्ये अनन्या पांडे 'अहाना'च्या भूमिकेत दिसत आहे. सिद्धांत चतुर्वेदी 'इमाद' तर आदर्श गौरव 'नील'च्या भूमिकेत आहे. दोन मिनिट 40 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये मुंबई बॅकड्रॉपला दाखवण्यात आली आहे. तीन मित्रांच्या मैत्रीभोवती फिरणारं या सिनेमाचं कथानक आहे. 'खो गए हम कहां'च्या ट्रेलरमध्ये आयुष्याला कंटाळलेले तीन मित्र आणि त्यांचं कुटुंबियांसोबतचं बाँडिंग दाखवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
'खो गए हम कहां' कधी रिलीज होणार? (Kho Gaye Hum Kahan Release Date)
'खो गए हम कहां' हा सिनेमा 26 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. जोया अख्तर आणि रीमा कागतीने या सिनेमाची कथा लिहिली आहे. तर अर्जुन सिंहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. जोया अख्तर सध्या 'द आर्चीज' या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
'खो गए हम कहां' या सिनेमात रोमान्स आणि भावनिक नाट्य पाहायला मिळत आहे. या सिनेमात आदर्श गौरव, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुवेर्दीसह कल्कि कोचलिन, आन्या सिंह, रोहन गुरबक्सानी, विजय मौर्य, दिव्या जगदाले, राहुल वोहरा आणि सुचित्रा पिल्लई महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एक्सेल एंटरटेनमेंटचे रितेश सिधवानी, फरहान अख्तर, रीमा कागती आणि जोया अख्तर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तरुणांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या