Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये झळकणार शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक; छोट्या भाईजानचा व्हिडीओ व्हायरल
Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये शिव ठाकरे आणि अब्दू रोझिकची जोडी दिसणार आहे.
Khatron Ke Khiladi 13 Latest Update : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. आता या कार्यक्रमासंदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अब्दू (Abdu Rozik) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) दिसत आहेत.
अब्दु रोझिकबद्दल एक अपडेट समोर आली आहे. अब्दूने 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आता अब्दू या कार्यक्रमात दिसणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. 'बिग बॉस 16' या कार्यक्रमात शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक एकत्र झळकले होते. त्यांची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा त्यांच्या जोडीची कमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
शिव ठाकरेने शेअर केला अब्दूसोबतचा फोटो
शिव ठाकरे आणि अब्दू रोझिकला 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शिवने इंस्टा स्टोरीवर अब्दूसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शिवने लिहिलं आहे,"अब्दू रोझिक खतरों के खिलाडीमध्ये तुझं स्वागत मेरी जान".
'खतरों के खिलाडी' हा रोहित शेट्टीचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात स्पर्धक एकापेक्षा एक स्टंट करताना दिसणार आहेत. 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान अनेक स्पर्धक जखमी झाले आहेत. यात अर्चना गौतम, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, रोहित रॉय, नायरा बॅनर्जी आणि सौंदस मौफकीर या स्पर्धकांचा समावेश आहे.
अब्दू रोझिक कोण आहे? (Who Is Abdu Rozik)
अब्दू रोजिक 'बिग बॉस 16' मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या हटके खेळीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मात्र, 14 जानेवारी 2023 रोजी अब्दूने काही कारणाने या कार्यक्रमामधून एक्झिट घेतली. कार्यक्रमातून बाहेर पडताच त्याने त्याचं 'प्यार' हे हिंदी गाणं लाँच केलं. हे गाणं त्याच्या चाहत्यांना खूप आवडलं.
अब्दू रोजिक हा तजाकिस्तानमधील लोकप्रिय गायक आहे. याशिवाय तो एक लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. केवळ 3 फूट उंची असलेल्या अब्दूचा दुबईत प्रचंड बोलबाला आहे. अब्दू हे नाव जगभरात लोकप्रिय आहे. 'बिग बॉस 16'च्या माध्यमातून त्याने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा 'खतरों के खिलाडी 13'मध्ये धमाका करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
संबंधित बातम्या