Katrina Kaif Vicky Kaushal Wedding LIVE : कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही विवाह सोहळ्याचे प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर
LIVE
Background
राजस्थानमध्ये बांधणार विकी आणि कतरिना लग्नगाठ
विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
कतरिना आणि विकीच्या लग्नात 'या' अटींचा समावेश
कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना खास निमंत्रण कोड देण्यात येणार आहे. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. तसेच पाहुण्यांना लग्नासंबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही.
कतरिना आणि विकीची लव्ह-स्टोरी... पहिल्या भेटीचा किस्सा
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची रेशीमगाठ जुळण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. कतरिना आणि विकीचा राजस्थानमध्ये आज शाही विवाह होणार आहे. अनेकांना प्रश्न नक्की पडला असेल की, यांचं प्रेम नक्की जुळलं कसं? तर याबाबत आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत.
मुळात हे सर्व बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शोमध्ये सुरू झालं. कतरिनाने 'उरी' फेम विकीसोबत काम करायला आवडेल असं करण जोहरला सांगितलं. त्यानंतर विकी करणच्या चॅट शोमध्ये आला असता, त्यानं हे विकीला सांगितलं. कतरिनाच्या मते, विकी आणि तिची जोडी मोठ्या पडद्यावर चांगली दिसेल, असं करणनं म्हटलं. हे ऐकताच विकीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून आला.
नंतर ही जोडी एका मुलाखतीत एकत्र झळकली.एका कॉमन फ्रेंडने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत त्यांनी त्यांची पहिली सार्वजनिक हजेरी लावली. ते 'शेरशाह' चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही एकत्र दिसले होते. या व्यतिरिक्त, लॉकडाऊनमध्ये आणि अगदी अलीकडेही विकी अनेकदा त्याच्या प्रेयसीला भेटताना दिसला. त्यांनी मित्रांसोबत बाहेरगावी परदेशी सुट्ट्यांचाही आनंद लुटला. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा मुंबईतील दिग्दर्शक कबीर खान यांच्या घरी गुपचुप रोका केला.
Katrina Vicky Wedding : कतरिना-विकीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, वराची होणार शाही एन्ट्री
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचे विधी सिक्स सेन्स फोर्टवर सुरू झाले आहेत. विकी-कतरिनाच्या लग्नासाठी खास दिल्लीहून फुले मागवण्यात आली आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या सजावटीसाठी दिल्लीतील गाझीपूरमधून 1500 किलो फुलं मागवण्यात आली आहेत. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिक्स सेन्स फोर्टच्या मर्दाना महलासमोरील मोकळ्या बागेत विकी कतरिनाच्या स्वप्नातील लग्नाचा मंडप उभारला गेला आहे. काही वेळातच विकी-कतरिना विवाहबंधनात अडकणार आहेत. विकी राजेशाही पद्धतीने राजवाड्यात प्रवेश करणार आहे. दोघांचे फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात येणार आहे.
विकी आणि कतरिनाने लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 80 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला
विकी आणि कतरिनाने लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 80 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या ठिकाणी कॅमेरा आणि मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एजेन्सीनं फोटो अथवा व्हिडीओ लीक होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली आहे. एका रिपोर्टनुसार, विकी-कतरिनाच्या लग्नातील फुटेजसाठी एका ओटीटीनं मोठी ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ अॅमेझॉन प्राईम व्हिडिओला 80 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये बांधणार विकी आणि कतरिना लग्नगाठ
विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. बरवाडा किल्ल्याला खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.