एक्स्प्लोर
थँक यू सुलतान, फेसबुकवर सलमानला कतरिनाचा रिप्लाय

मुंबई : बॉलिवूडची ब्यूटी क्वीन कतरिना कैफने 33 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून फेसबुकवर एन्ट्री घेतली. तिचं स्वागत करत सलमानने तिला बर्थडे विश केलं आणि कतरिनानेही 'थँक यू सुलतान' असा रिप्लाय दिला. कतरिना आतापर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती, मात्र फेसबुकवर अचानक एन्ट्री घेत तिने चाहत्यांना सरप्राईज केलं होतं. कतरिनाच्या पहिल्या सोशल अकाऊण्टवर काही तासांतच लाखो लाईक्स आले. त्यापैकी सलमान खानकडून तिचं झालेलं स्वागत सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय होतं. 'फेसबुकवर तुझं स्वागत आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' अशी पोस्ट सलमान खानने कतरिना कैफला केली. त्यावर उत्तर देताना कतरिनाने 'थँक यू सुलतान' असं म्हणत आभार मानले.
कतरिनाने तिच्या मुंबईतल्या महागड्या घराचा व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. याच घरात कतरिना आणि रणबीर कपूर राहत असल्याचं म्हटलं जातं.
कतरिनाने तिच्या मुंबईतल्या महागड्या घराचा व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. याच घरात कतरिना आणि रणबीर कपूर राहत असल्याचं म्हटलं जातं. आणखी वाचा























