सेम टू सेम कतरिनाच! नेटकरी झाले अवाक्, म्हणाले, 'सलमान भाई...'.
आता अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Katrina Kaif: सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्या तरुणीचा लूक पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.
अलीना राय (Alina Rai) या तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलीना ही हुबेहूब कतरिनासारखी दिसते, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये अलीना ही ब्लॅक शिमर ड्रेस, हातात ब्लॅक पर्स आणि ब्लॅक इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे. अलीनाच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
'थोडी प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर ही सेम कतरिनासारखी दिसत आहे.', अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट करत लिहिलं, 'सलमान भाईला तुझं लोकेशन जाणून घ्यायचं आहे.' तर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मला वाटलं ही कतरिना कैफ आहे.'
View this post on Instagram
अलीना ही सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोवर्स आहेत. अलीनाच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते.
कतरिनाचा आगामी चित्रपट
काही दिवसांपूर्वी कतरिना ही फोन भूत या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता लवकरच तिचा टायगर-3 हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात कततरिनासोबतच अभिनेता सलमान खान देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Deepika Padukone : 'सेम टू सेम'; दीपिकासारख्या दिसणाऱ्या तरुणीची सोशल मीडियावर हवा!