Katrina Kaif, Vicky Kaushal : कतरिना कैफ-विकी कौशल चाहत्यांना देणार ‘गुडन्यूज’? वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी जोडी मालदीवला रवाना!
Katrina Kaif, Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज (16 जुलै) तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे.
Katrina Kaif, Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज (16 जुलै) तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री, पती विकी कौशल (Vicky Kaushal) याच्यासोबत मालदीवला रवाना झाली आहे. मालदीवमध्ये विकी आणि कतरिना वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणार आहेत. दोघांचे मालदीवला रवाना होतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. विकी आणि कतरिना मालदीवला रवाना होत असताना पापाराझींनी त्यांना मुंबई विमानतळावर घेरले होते.
विकीचा भाऊ सनी कौशल आणि त्याची गर्लफ्रेंड शर्वरी वाघ देखील त्यांच्यासोबत मालदीवमध्ये जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार कतरिना कैफ आणि विकी कौशल आज या खास दिवशी प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांशी शेअर करू शकतात. कतरिना कैफ गेल्या अनेक दिवसांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. कतरिना शेवट निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती. इंस्टाग्रामवरही तिने 28 जून रोजी शेवटची पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचा अंदाज चाहत्यांनीही लावला आहे.
पाहा व्हिडीओ
इतकंच नाही तर, मालदीवला जाताना कतरिनाने ओव्हरसाईज टीशर्ट परिधान केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना हवा मिळाली आहे. यावेळी विकी कौशल क्लीन शेव्हन लूकमध्ये दिसला. मात्र, सर्वांच्या नजरा कतरिनाच्या स्वेटशर्टवर खिळल्या होत्या. कतरिनाने नारंगी रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केले होते. तर, विकी कौशलने हिरवे जॅकेट, काळी कॅप आणि कार्गो पँटसह त्याचा एअरपोर्ट लूक पूर्ण केला होता. यावेळी त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसाठी फोटो पोज दिल्या.
लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, सवाई माधोपूर येथे लग्न केले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे, हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
Katrina Kaif ,Vicky Kaushal Photos : विकी कतरिना स्पेंड करतायत 'क्वालिटी टाईम'; शेअर केले खास फोटो
katrina kaif, Vicky Kaushal : कतरिनाचा एअरपोर्टवरील व्हायरल व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, 'प्रेग्नंट आहेस का?'