(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartik Aaryan Struggle Story: कुटुंबापासून लपवून सुरू केले अॅक्टिंग करिअर, 1500 रुपयांपासून सुरू केला प्रवास, आज आहे 250 कोटींचा मालक
Kartik Aaryan Struggle Story: फिल्मी जगतातील पार्श्वभूमी नसताना अनेकजण या सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असतात. त्यात काहींना अपयश येते आणि सिनेइंडस्ट्रीला अलविदा करतात.
Kartik Aaryan Struggle Story : बॉलिवूडमध्ये नेहमीच आऊटसाईडर असलेल्या कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो. फिल्मी जगतातील पार्श्वभूमी नसताना अनेकजण या सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असतात. त्यात काहींना अपयश येते आणि सिनेइंडस्ट्रीला अलविदा करतात. तर, काहीजण यशस्वी होतात. अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) आपले स्वतंत्र स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे.
कार्तिक आर्यनेने आपल्या कुटुंबियांपासून आणि मित्रांपासून लपवून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आणि त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कार्तिकने आपण चित्रपटात काम करत असल्याचे सांगितले. स्ट्रगलच्या दिवसात हातात मोजकेच पैसे असणारा कार्तिक आज अब्जाधीश झाला आहे.
कार्तिक आयर्नचा स्ट्रगल...
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जन्मलेला 33 वर्षीय कार्तिक आर्यन इंजिनिअरिंग करण्यासाठी मुंबईत आला होता. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक येथील महाविद्यालयाची निवड केली होती. कार्तिक आर्यनने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तो कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने ऑडिशनला जायचा पण त्याला संधी मिळाली नाही. जेव्हा त्याला 'प्यार का पंचनामा' (2011) या चित्रपटात भूमिका मिळाली. तेव्हा त्याने ही बाब चित्रपट रिलीज होईपर्यंत लपवली होती. त्यावेळच्या दिवसांत त्याला घरातून 1500 रुपये पॉकेटमनी मिळत असे.
View this post on Instagram
पहिल्या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण होईपर्यंत कार्तिकने त्याच्या नशिबावर विश्वास नसल्यामुळे त्याचे मित्र आणि कुटुंबीयांना काही सांगितले नाही. हा चित्रपट रिलीज होईपर्यंत कार्तिकने आपण यात काम केलंय हे लपवून ठेवले. पण जेव्हा चित्रपटाला प्रतिसाद मिळू लागला तेव्हा त्याने आपल्या घरी आपल्या अॅक्टिंग करिअरबद्दल सांगितले. सुरुवातीला आई-वडिलांनी त्यांना खूप फटकारले पण नंतर त्यांचा मुलगा स्टार झाल्यावर तेही आनंदी झाले.
कार्तिक आर्यनचे चित्रपट
'प्यार का पंचनामा' नंतर कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा 2', 'पति पत्नी और वो', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'भूल भुलैया 2', 'लुका छुपी', 'सत्यप्रेम की कथा' आणि 'प्यार का पंचनामा' केले. 'चंदू चॅम्पियन'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कार्तिकच्या आगामी चित्रपटांमध्ये 'आशिकी 3', 'भूल भुलैया 3' आणि इतरही प्रोजेक्टचा समावेश आहे.
कार्तिक आर्यनची एकूण संपत्ती किती?
कार्तिक आर्यनने या 13 वर्षांत 1500 रुपये ते 40 कोटी रुपयांचा प्रवास केला आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, कार्तिक आर्यनकडून एका चित्रपटासाठी 40 कोटी रुपये मानधन आकारले जाते. याच रिपोर्टमध्ये कार्तिक आर्यनची संपत्ती ही 250 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. कार्तिक आर्यनचा मुंबईत आलिशान फ्लॅट असून त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.