Karisma Kapoor : 'हनीमूनलाच त्याने मला त्याच्या मित्रासोबत झोपायला सांगितलं, माझा लिलावही केला'; कपूरांच्या लेकीचा नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
Karisma Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हीने तिच्या लग्नाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही बॉलीवूडमधील (Bollywood) टॉपची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचे जितके चाहते आहेत तितकेच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. राज कपूर यांची नात, रणधीर कपूर यांची लेक असूनही करिश्माने तिचं इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण इतकं असूनही तिला तिच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यात काहीसं अपयश आलं आहे. इतकच नव्हे तर तिने तिच्या हनीमूनला झालेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
करिश्माने 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. पण त्यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केलेत. त्याचदरम्यान करिश्माने देखील एक धक्कादायक खुलासा केला आहे. संजयने हनीमूनला गेल्यानंतर मित्रासोबत मला झोपायला लावलं आणि माझा लिलावही केला असा आरोप करिश्माने केलाय.
करिश्माने नेमकं काय म्हटलं?
झूम टिव्हीच्या रिपोर्टनुसार, करिश्माने त्यांच्या हनीमूनचा एखादा प्रसंग सांगितला आहे. हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला. त्याचप्रमाणे संजय आर्थिक गोष्टींमध्ये त्रास दिल्याचा खुलासा कंगनाने केला आहे. पण यावर संजयने करिश्माने केवळ त्याच्याशी पैशांसाठी लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे.
त्याने सासूला गरोदरपणात मारहाण करायला सांगितली
दरम्यान पुढे करिश्माने म्हटलं की, माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंनी एक ड्रेस माझ्यासाठी आणला होता, पण तो मला नीट बसला नाही. तेव्हा संजयने माझ्या सासूबाईंना मला मारायला सांगितलं. दरम्यान करिश्माच्या घटस्फोट होऊन आता वर्ष लोटली आहेत. पण तिने केलेल्या या खुलाश्यामुळे पुन्हा एकदा तिचं आणि संजयचं नातं चर्चेत आलं आहे.
View this post on Instagram