Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' लवकरच होणार सुरू; पहिल्याच भागात हजेरी लावणार बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान!
Koffee With Karan : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Karan Johar Koffee With Karan 8 : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 8) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. लवकरच या बहुचर्चित कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासंबंधित गुपित करण त्याच्या हटके स्टाईलने उलगडत असतो. त्यामुळे ते सेलिब्रिटी चर्चेत येतात. या कार्यक्रमाचे आजवरचे सर्व सीझन सुपरहिट झाल्याने नव्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
'कॉफी विथ करण 8'मध्ये एका पेक्षा एक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पहिल्या भागापासूनच हा कार्यक्रम मनोरंजनात्मक असणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सहभागी होणार असल्याचं समोर आलं आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. तसेच त्याचा 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
'कॉफी विथ करण 8'मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार्सचा बोलबाला!
'कॉफी विथ करण'मध्ये प्रामुख्याने बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होत असतात. पण यंदाचं पर्व थोडं खास आहे. या पर्वात 'केजीएफ' फेम यश, 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन, 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावणार आहेत. त्यामुळे 'कॉफी विथ करण 8'मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार्सचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच हे पर्व खूपच मनोरंजनात्मक असणार आहे.
'कॉफी विथ करण 8' ओटीटीवर होणार सुरू (Koffee With karan On OTT)
'कॉफी विथ करण'चं पहिलं पर्व 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छोट्या पडद्यावर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचं सातवं पर्व मात्र डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालं. आता आठवं पर्वदेखील प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवरच (Disney + Hotstar) पाहायला मिळणार आहे. कॉफी विथ करण' या कार्यक्रमामुळे करणला लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या 17 वर्षात बॉलिवूडच्या अनेक नामांकित चेहऱ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. आता आठव्या पर्वाची सर्वांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Koffee With Karan : करणची महागडी कॉफी; एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो तब्बल एक ते दोन कोटींचे मानधन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
