करण जोहर-मधुर भंडारकर यांच्यात ‘बॉलिवूड वाईव्ज’वरुन जुंपली, चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा भंडारकरांचा आरोप
मधुर भंडारकर यांनी करण जोहरळा वेबसीरीजचं टायटल बदलावं असं सुचवलं आहे. पण अद्याप करणने त्याला उत्तर दिलेलं नाही.
![करण जोहर-मधुर भंडारकर यांच्यात ‘बॉलिवूड वाईव्ज’वरुन जुंपली, चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा भंडारकरांचा आरोप Karan Johar and Madhur Bhandarkar title war on Fabulous Lives of Bollywood Wives web series करण जोहर-मधुर भंडारकर यांच्यात ‘बॉलिवूड वाईव्ज’वरुन जुंपली, चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा भंडारकरांचा आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/21160313/KJo_Madhur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा करण जोहरचं नाव नव्याने समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी करण जोहर आणि कंगना रनौत यांच्यात जुंपली होती. कंगना सातत्याने करणवर नेपोटिझमचा आरोप करत होती. त्यावर करण खरंतर काहीच बोलत नव्हता. पण आता पुन्हा एकदा करण जोहरचं नाव नव्याने समोर आलं आहे. याला कारण ठरलं आहे करण जोहरच्या नव्या वेबसीरीजचं नाव.
करण जोहरने नव्याने एक वेबसीरीज तयार केली आहे. त्या सीरीजचं नाव आहे ‘फॅब्युलस लाईव्ज ऑफ बॉलिवुड वाईव्ज’. करण जोहरने हे नाव रजिस्टर केलं. आता या वेबसीरीजटच्या नावावरून एक नवा वाद समोर आला आहे. कारण या नावाला दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी हरकत घेतली आहे. मधुर भंडारकर हे नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी चांदनी बार, कार्पोरेट, फॅशन आदी अनेक सिनेमे केले. आता ते आणखी एक नवा सिनेमा करत आहेत. त्या सिनेमाचं नाव आहे बॉलिवूड वाईव्ज. त्यांनी या सिनेमाचं नाव रजिस्टर केलं आहे. पण आता करण जोहरने ते नाव आपल्या वेबसीरीजला घेतल्यामुळे भंडारकर नाराज झाले आहेत.
याबद्दल बोलताना मधुर भंडारकर म्हणाले, जोहर आपल्या वेबसीरीजला हे नाव देणार आहेत याची मला कल्पना नव्हती. हे नाव वेबसीरीजला द्यायची गोष्ट कळल्यावर मी त्यांच्या निदर्शनास हे आणून दिलं होतं. हे नाव मी घेऊन ठेवलं आहे. ते माझ्या सिनेमाचं असणार आहे. असं असूनही त्यांनी हे नाव वापरणं हे माझ्यासाठी चकित करणारं आहे. करण जोहर आणि अपूर्वा मेहता यांनी मी रजिस्टर केलेल्या टायटलमध्ये ट्विस्ट आणून सीरीजला नावं दिलं आहे. खरं तर त्यांनी हे नाव वापरू नये असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. हे नैतिकतेला धरून नाहीय’, असही मधुर भंडारकर म्हणाले.
भंडारकर यांनी करण जोहर यांना हे टायटल बदलावं असं सुचवलं आहे. पण अद्याप करणने त्याला उत्तर दिलेलं नाही. आता यात करण जोहरच्या नावाचा उल्लेख झाल्यामुळे कंगना रनौतला आयतं कोलीत हाती मिळणार आहे. यात कंगनाने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. पण ती आता काय बोलते याकडे अनेकांचं लक्ष आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)