एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : वैदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

Kon Honar Crorepati : आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे (Nitesh Karale) गुरुजी येणार आहेत. 

कराळे गुरुजींना ऐकणं प्रेक्षकांसाठी पर्वणी

वर्ध्यातल्या कराळे मास्तरांनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला असून हेच मास्तर आता हॉटसीटवर बसून 'कोण होणार करोडपती'मध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. येत्या शनिवारच्या विशेष भागात नितेश कराळे गुरुजी सहभागी होणार असून त्यांच्यासह कर्नल सुरेश पाटील  हेही सहभागी होणार आहेत. युट्यूबवर लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

'ग्रीन थंब एनव्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ग्रूप - साथी रे' या संस्थेसाठी खेळणार कराळे गुरुजी

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या आठवड्यातल्या विशेष भागात कराळे गुरुजी कर्नल सुरेश पाटील यांच्या 'ग्रीन थंब एनव्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ग्रूप - साथी रे' या संस्थेसाठी खेळणार आहेत. 

करोना काळात शिकवणीचे वर्ग बंद होते, म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या नितेश कराळे यांनी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन देण्याचं ठरवलं. अनेक क्लिष्ट विषय सहज आणि सोप्या पद्धतीनी मांडण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा आहे. त्यावर अस्सल वऱ्हाडी भाषेची फोडणी दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कराळे गुरुजींचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. 

आपल्या भाषेतून संपादन केलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहतं, असं मत कराळे गुरुजींनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त केलं. कोरोनाचं संकट येण्यापूर्वी कराळे 300 विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं शिकवायचे. मात्र कोरोनामुळे शासनानी लॉकडाऊन केलं आणि सुरू असलेले क्लासेस बंद पडले. कराळे गुरुजींनीही ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना गुगल मीट, झूम अ‍ॅप यांच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही अडचणी आल्यानं त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले.  ज्वालामुखी शिकवताना कराळे गुरुजींची बोली अस्सल वऱ्हाडी असल्याने 'खदखदणारा' ज्वालामुखी, भूगोलातला लाव्हा रस, मराठीतले व्याकरण, इतिहास आणि गणित शिकवतानाही  त्यांच्या बोलीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरं लक्षात राहण्यास चांगलीच मदत होते आहे.

विदर्भातल्या एका मास्तरांनी वऱ्हाडी बोलीतून साध्या-सोप्या संकल्पना शिकवण्याचा विडा उचललेल्या आणि  सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना हॉटसीटवर पाहणं हे मनोरंजक ठरणार आहे.

कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

Kajol : 'मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं'; 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात काजोलनं सांगितले किस्से

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget