Kapil Sharma on Netflix : 'आय एम नॉट डन येट; कपिल शर्माच्या कॉमेडीची जादू आता लवकरच नेटफ्लिक्सवर
Kapil Sharma New show : छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्मा आता ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
Kapil Sharma New show : छोटा पडदा गाजवल्यानंतर कपिल शर्मा आता ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. लवकरच कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर 'आय एम नॉट डन येट' (I Am Not Done Yet) हा कार्यक्रम सुरू होणार आहे.
हा कपिल शर्माचा स्टॅंड अप कॉमेडी कार्यक्रम आहे. या विनोदी कार्यक्रमात कपिलचे मोडके तोडके इंग्रजीदेखील प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. कपिलचे चाहते आता त्याच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत.
कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'चे प्रेक्षक नेहमी कौतुक करत असतात. कपिलच्या आगामी कार्यक्रमात कपिल त्याच्या स्टाईलमध्ये त्याची कथा ऐकवणार आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'कपिल शर्मा- आय एम नॉट डन येट' कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये कपिल शर्मा त्याला हा कार्यक्रम कसा मिळाला हे सांगताना दिसत आहे. कपिलचा 'कपिल शर्मा- आय एम नॉट डन येट' हा कार्यक्रम 28 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Yeh koi hasi-mazaak ki baat nahi hai when we tell you that @KapilSharmaK9's stand up special is coming to Netflix 😱😱😱
— Netflix India (@NetflixIndia) January 5, 2022
'Kapil Sharma: I’m Not Done Yet' arrives on January 28! #KapilSharmaOnNetflix pic.twitter.com/fdenfsvk7m
कपिल शर्माचा आगामी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलने प्रेक्षकांना नवीन वर्षाची चांगलीच भेट दिली आहे. त्याच्या आगामी कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिल 190 देशांमध्ये पोहोचणार आहे.
संबंधित बातम्या
Anupam Kher Viral Video : अनुमप खेर यांनी शेअर केला आईचा मजेशीर व्हिडीओ, भटजींना विचारले लग्नासंदर्भात प्रश्न
Radhe Shyam Postponed : बॉलिवूड सिनेमांना कोरोनाचा फटका, प्रभासच्या 'राधे श्याम'ची रिलीज डेट ढकलली पुढे
Sindhutai Sapkal : 'हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या...'; माईंसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha