(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhutai Sapkal : 'हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या...'; माईंसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Sindhutai Sapkal : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सिंधुताईंच्या जीवनावर आधारीत असलेला 'मी सिंधुताई सपकाळ' (Mee Sindhutai Sapkal) हा मराठी चित्रपट 30 ऑक्टोबर 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) साकारली होती. सिंधुताई यांच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.
तेजस्विनीची पोस्ट
'अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस? पोस्ट नाही केलीस ? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. ', असं तेजस्विनीनं पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
तेजस्विनीने पोस्टमधून सांगितल्या माईंसोबतच्या आठवणी
पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिले, माई आणि मी रोज संपर्कात नव्हतो .पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस!'
तेजस्वीननं 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या :
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास