Anupam Kher Viral Video : अनुमप खेर यांनी शेअर केला आईचा मजेशीर व्हिडीओ, भटजींना विचारले लग्नासंदर्भात प्रश्न
Anupam Kher Viral Video : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर आईचा गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
Anupam Kher Viral Video : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. आज त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आईचा एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या भाचीच्या लग्नादरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांची आई भटजीला सिकंदर खेरच्या लग्नासंदर्भात मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्या प्रश्नांवर भटजीदेखील मजेदार उत्तर देताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये अनुपम खेर त्यांच्या आईला गंमतीने विचारतात,"तुझा या भडजींवर विश्वास आहे का?" त्यावर त्यांची आई म्हणते,"18 आणे, 16 आणे नाही तर पूर्ण पाच रुपयांचा विश्वास आहे". त्यांची आई पुढे म्हणाली,"माझं लग्न रात्रभर सुरू होतं". यावर अनुपम खेर म्हणतात,"रात्र पूर्ण व्हायला 59 वर्षे लागली आहेत".
View this post on Instagram
दरम्यान त्यांची आई भटजींना विचारते की, त्यांच्या नातवाचे म्हणजेच सिकंदरचे लग्न कधी होणार? यावर भटजी म्हणतात,"जो शिकतो तो सिकंदर आहे. लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे".
संबंधित बातम्या
Radhe Shyam Postponed : बॉलिवूड सिनेमांना कोरोनाचा फटका, प्रभासच्या 'राधे श्याम'ची रिलीज डेट ढकलली पुढे
Amitabh Bachchan : बिग बींच्या घरात कोरोनाचा शिरकाव; बंगल्यावर काम करणारा एक कर्मचारी कोरोनाबाधित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha