Sampath J : दाक्षिणात्य अभिनेता संपत जे रामचे निधन; काम मिळत नसल्याने अवघ्या 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य
Sampath J : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामने वयाच्या 35 व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे.
![Sampath J : दाक्षिणात्य अभिनेता संपत जे रामचे निधन; काम मिळत नसल्याने अवघ्या 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य Kannada Actor Sampath J Ram Found Dead in His Home Police Suspect Suicide Sampath J : दाक्षिणात्य अभिनेता संपत जे रामचे निधन; काम मिळत नसल्याने अवघ्या 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/ae85fbe6b183a5c4cff83913dcac74891682317558886254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kannada Actor Sampath J Ram Passes Away : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संपत जे रामचे (Sampath J Ram) निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. काम मिळत नसल्याने अभिनेत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 22 एप्रिल 2023 रोजी संपत जे रामने आत्महत्या केली आहे. कर्नाटकातील नेलमंगला येथील त्याच्या घरातच गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपत गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे नैराश्येचा सामना करत होता. करिअरमध्ये येणाऱ्या चढ-उतारांमुळे संपत खचला होता.
चांगले काम मिळत नसल्याने संपत जे रामने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं असलं तरी अभिनेत्याच्या कुटुंबियांनी मात्र यासंदर्भात माहिती दिलेली नाही. अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचलल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनावर दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
संपत जे राम हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कन्नडमधील अनेक मालिकांमध्ये संपतने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'अग्निसाक्षी' या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. 'श्री बालाजी फोटो स्टूडिओ' या सिनेमांतदेखील तो झळकला आहे.
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त
संपत जे रामच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. संपतचा खास मित्र आणि सहकलाकार राजेंद्र ध्रुवने खास पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्याने लिहिलं आहे,"कितीतरी सिनेमे आहेत..संघर्ष करायचा आहे आणि झळकायचं आहे... कृपया परत ये आणि स्वप्न साकार कर".
View this post on Instagram
विजय सूर्याने लिहिलं आहे,"संपत जे रामच्या निधनाची बातमी खोटी असल्याचं मला वाटलं होतं. पण नंतर मी चौकशी केल्यानंतर मला ही बातमी खरी असल्याचं कळालं. संपत जे राम आयुष्य संपवण्याचा निर्णय घेईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. एक अभिनेता म्हणून तो चांगल्या संधीच्या शोधात होता. करिअरवर त्याचा फोकस असून तो महत्तकांशी होता. माझा जवळचा, चांगला मित्र मला सोडून गेला आहे".
संबंधित बातम्या
Entertainment News Live Updates 24 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)