(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : हिप्पोक्रसीची पण सीमा असते... उमेदवारी जाहीर होताच कंगनाचे जुने ट्वीट व्हायरल
Kangana Ranaut : कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उतरणार आहे. कंगनाची उमेदवारी जाहीर होताच तिचे जुने ट्वीट व्हायरल होऊ लागले आहे. कंगनाला यावरून ती दुटप्पी भूमिका घेत असल्याचे म्हटले जात आहे.
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी जाहीर झाली आहे. कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha) निवडणुकीला उतरणार आहे. कंगनाची उमेदवारी जाहीर होताच तिचे जुने ट्वीट व्हायरल होऊ लागले आहे. कंगनाला यावरून ती दुटप्पी भूमिका घेत असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी आगामी लोकसभा 2024 निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील अभिनेत्री कंगना रणौतच्या नावाचा समावेश आहे.
कंगनाला हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढवायची नव्हती?
भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर कंगना रणौतनेही एक पोस्ट शेअर करून मंडीमधून तिच्या उमेदवारीची माहिती दिली आणि आनंद व्यक्त केला. आता, कंगनाचे एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे. यामध्ये कंगनाने आपल्याला हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. हिमाचल प्रदेशात तिथे ना गरीबी आहे ना गुन्हेगारी. मसा काम करण्यासाठी आव्हानात्मक ठिकाणाची आवश्यकता असल्याचे तिने म्हटले.
कंगना रणौत ट्रोल
कंगना राणौतच्या या जुन्या ट्विटमुळे तिला Reddit वर ट्रोल केले जात आहे. अभिनेत्रीचे हे ट्विट शेअर करताना एका यूजरने म्हटले की, ढोंगीपणालाही मर्यादा असतात. याशिवाय अनेकांनी कमेंट करून अभिनेत्री निवडणूक लढवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. काही युजर्सनी हिमाचल प्रदेशबद्दल चिंता व्यक्त केली.
Hypocrisy ki bhi seema hoti hai
byu/Affectionate-Can-310 inBollyBlindsNGossip
कंगना रणौतचे जुने ट्विट
मार्च 2021 मध्ये, एका युजरने कंगना मंडी लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे म्हटले. त्याला उत्तर देताना कंगनाने ट्विट केले होते, "2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मला ग्वाल्हेरचा पर्याय देण्यात आला होता. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या जेमतेम 60-70 लाख आहे, गरीबी, गुन्हेगार नाहीत. जर मी राजकारणात प्रवेश केला, तर मी मला असे राज्य हवे आहे जिथे मी आव्हानात्मक काम करू शकेल आणि लोकांचे प्रश्न सोडवून मी क्वीन होऊ शकेल असेही तिने म्हटले.